शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार : संभाजीराजेंना अजूनही आशा..

संभाजीराजे (Sambhaji Raje) यांना छत्रपती घराण्याचा सन्मान होणार असल्याचा विश्वास
Sharad Pawar News, Sambhajiraje News, Sanjay Raut News, Uddhav Thackeray News
Sharad Pawar News, Sambhajiraje News, Sanjay Raut News, Uddhav Thackeray Newssarkarnama
Published on
Updated on

पुणे : छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) हे राज्यसभेवर सर्वपक्षीय उमेदवार म्हणून जाणार की नाही, हा राजकीय वर्तुळातील प्रश्न अधिक उत्सुकतेचा बनला आहे. शिवसेनेने कोल्हापूर प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात आले असले तरी अद्याप संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यातील संवाद संपलेला नाही. मराठा संघटनांच्या काही प्रतिनिधींनी याबाबत खुद्द राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना यात लक्ष घालण्याची मागणी केली. त्या वेळी आपण याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन दिल्याचे यातील काही प्रतिनिधींनी सांगितले. (Sambhajiraje News)

Sharad Pawar News, Sambhajiraje News, Sanjay Raut News, Uddhav Thackeray News
शिवसेनेचं ठरलं; राज्यसभेसाठी संभाजीराजेंऐवजी कोल्हापुरातीलच संजय पवार

या संघटनांच्या प्रतिनिधींनी संभाजीराजे हे राज्यसभेवर जाणे कसे आवश्यक आहे, हे पवार यांना सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या घराण्याचा वारसदार राज्यसभेवर गेला तर तो चांगला योग ठरेल, असाही भावनात्मक मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला. भाजपही या प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात आले. संभाजीराजे यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला नाही तर सहाव्या जागेसाठी भाजप उमेदवार देऊ शकतो. अपक्षांच्या मदतीने भाजपही त्यांचा उमेदवार निवडून आणेल, अशीही भीती या चर्चेत व्यक्त करण्यात आली. भाजपने सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना पाठिंबा दिला तर तिथूनही महाविकास आघाडी ही छत्रपतींच्या घराण्याच्या विरोधात आहे, असा संदेश जाऊ शकतो. अशा अनेक बाबी या बैठकीत मांडण्यात आल्या.

Sharad Pawar News, Sambhajiraje News, Sanjay Raut News, Uddhav Thackeray News
संभाजीराजे यांना एकमेव आधार उरला तो मित्र मानलेल्या फडणविसांचा!

याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन पवार यांनी दिल्याने अजूनही संभाजीराजे यांच्या महाविकास आघाडीच्या मदतीने अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाऊ शकतात, अशी आशा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त आहे.

संभाजीराजे यांनी स्वराज ही संघटना स्थापन करणार असल्याची घोषणा करून चूक केल्याचे स्पष्ट मत पवार यांनी बैठकीत मांडले. मराठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग या संघटनेचा पाठिराखा असेल. याचा अर्थ राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना यांनाच या संघटनेचा फटका बसू शकतो, यावरही बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवायचा आणि दुसरीकडे त्यांच्या व्होटबॅंकेला धक्का लागेल, अशी कृती योग्य नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपच्या प्राथिमक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याचाही मुद्दा उपस्थित झाला. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर खासदार व्हायचे आणि उद्या भाजपच्या वळचणीला जाऊन बसायचे, असे कसे चालेल याकडेही लक्ष वेधण्यात आले. अमरावतीच्या खासदार या अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार झाल्या. पण त्या पूर्णपणे भाजपच्या पाठिराख्या झाल्याचेही उदाहरण या वेळी देण्यात आले.

ही सारी पार्श्वभूमी असली तरी संभाजीराजेंनी याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचा सन्मान ठेवतील, असा विश्वास व्यक्त केला. हा विश्वास म्हणजे पवार यांचा शब्द मुख्यमंत्री पडू देणार नाहीत, या भावनेतून असल्याचे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com