Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : "माझं काही खरं नाही", म्हणणारे जयंत पाटील आज काय तो निर्णय घेणार? सांगलीत मेळावा

NCP-SP Sangli Gathering : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपसह अजित पवार गटही पायघड्या घालून तयार आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजप प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चेची राळ बसते न बसते तोच ते अजित पवार यांच्यासोबत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. त्यातच त्यांच्या "माझं काही खरं नाही", या वक्तव्याने या संशयाला अधिक हवा दिली आहे. अशातच आज (ता.15) दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. यामुळे या चर्चांना अधिकच महत्व प्राप्त होताना दिसत आहे.

सांगलीत जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे तसेच सांगली जिल्ह्यातील आजी माजी आमदार, खासदारांसह जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात जयंत पाटील काय बोलणार याकडे अख्या राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना पूर्णविराम लागतो ना लागतो तोच त्यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चा ना रंग चढला होता.

याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी यापूर्वी देखील अशा चर्चांना थारा न देता त्याचे खंडन केले आहे. तसेच आपण पक्ष सोडणार नाही, पक्षासोबतच राहू असे स्पष्टीकरण दिले आहे. पण विरोधकांच्याकडून त्यांच्या भाजप प्रवेशासह आता अजित पवार गटातील प्रवेशाच्या बातम्या फिरल्या जात आहेत. त्याचबरोबर चर्चा सुरू आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी शरद पवार गटाने कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांचं आयोजन केले आहे. याच मेळाव्यात जयंत पाटील आपली भूमीका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तर जयंत पाटील काय बोलणार याकडे अख्या राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान जयंत पाटील यांनी, बारामती येथे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पक्ष प्रवेशावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण नाराज असल्याच्या चर्चांबद्दल स्पष्टीकरण देताना, "आपण नाराजी वगैरे काही नाहीये. आता मला बोलायचीच चोरी झालीय. मी फक्त शक्तीपीठ विरोधातील मोर्चात सहभाग घेताना भाषण करताना, राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही. मी त्यांना आघाडीकडून उभं राहायला सांगत होतो, पण. त्यावेळीच माझं काही तुम्ही गृहीत धरू नका. खरं धरू नका, असं म्हटलं होतं. आता त्याचविधानावरून मी नाराज आहे पासून ते पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेलीय. कदाचित सगळ्या प्रसार माध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की, मला काही करून कुठेतरी" असे मिश्कील विधान केलं होतं.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT