Jayant Patil News : जयंत पाटील बारामतीत, पवारांसोबत फेरफटका; म्हणाले, एकट्यानं इकडं, तिकडं जाणं...

NCP Sharad Pawar News Maharashtra Politics : मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
Jayant Patil, Sharad Pawar
Jayant Patil, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ‘माझं काही खरं नाही’, हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहेत. पाटील पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी थेट बारामती गाठली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचा फेरफटकाही मारला.

शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील यांच्या भेटीला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. नाराजीच्या चर्चेदरम्यान ही भेट झाल्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहे. पाटील यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना पुन्हा एकदा आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बाहेर बोलायची चोरी झाली आहे, असे ते म्हणाले आहेत.

Jayant Patil, Sharad Pawar
Ram Satpute : राम सातपुतेंचे मोहिते पाटलांना पुन्हा चॅलेंज; म्हणाले, मी 110 वर्षे माळशिरसमध्येच राहणार, कुठेही जाणार नाही’

जयंत पाटील यांच्या नाराजीवर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा पवारसाहेबांना सूचक इशारा आहे, सतर्क राहावे, असे विधान केले होते. त्यालाही पाटलांनी उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही एका कुटुंबातील आहोत. एकमेकांना इशारा देत बसत नाही. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, असे पलटवार पाटील यांनी केला.

आमचा पराभव झाला असला तरी महाराष्ट्रात पवारसाहेबांवर प्रेम असणारे लाखो लोक आहेत. त्यांचा तो पक्ष आहे. त्यामुळे जे काही असेल तो पक्षाचा निर्णय आम्ही एकत्रित करू. एकट्याने इकडं जाणं आणि तिकडं जाणं, हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाहीत, असेही पाटील म्हणाले आहेत.

Jayant Patil, Sharad Pawar
Maharashtra Politics : जयंत पाटलांना आमचा रंग आवडेल, उपमुख्यमंत्र्यांची खुली ऑफर

शक्तिपीठ मार्गाच्या आंदोलनावेळी बोलताना केलेल्या विधानावर खुलासा करताना पाटील म्हणाले, राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही खरं धरू नका. तुम्ही तुमचे आंदोलन सुरू ठेवा, त्याला पाठिंबा आहे, अशी माझी भावना होती. त्यातून मी नाराज आहे. माझा पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली.

(25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com