Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : 'नगर दक्षिण'च्या जागेवर शरद पवारांची राष्ट्रवादी लावणार ताकद; कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश!

Sharad Pawar On NCP Crisis : जिल्ह्यातील सहा पैकी चार आमदार अजित पवार गटात गेले असले तरी..

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी पक्षाच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हानिहाय आढावा स्वतः शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतल्याची माहिती नगर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी दिली. नगर दक्षिणेची जागा आघाडीत राष्ट्रवादीकडे असली, तरी बदलत्या राजकीय परस्थितीतीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने यावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

अशा बदललेल्या राजकीय परिस्थितीत संभाव्य लोकसभा उमेदवार आमदार निलेश लंके हे अजित पवार गटात गेले आहेत. या जागेवर राष्ट्रवादीचाच अधिकार असून पक्षाचे जेष्ठ नेते अंकुश काकडे यांना नव्या उमेदवाराबाबत चाचपणी करण्यास सांगितले असून, लवकरच या नावाची घोषणा होईल, असे कळमकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. त्यामुळे 2019 प्रमाणे शरद पवार कोणत्याही परस्थितीत नगर दक्षिणेची जागा सोडणार नाहीत, असे दिसून येत आहे.

बैठकीस नगर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, संदीप वरपे, शहराध्यक्ष नामदेव पवार आदी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष फुटीनंतर शरद पवार यांनी राज्यात सभांचा सिलसिला सुरू केला आहे. त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असून त्यात तरुणांचा ओढा मोठा असल्याचे दिसून येत आहे.

याच अनुषंगाने नगर शहरात पवार यांच्या सभेसाठी आग्रह करण्यात आला. यास पवार यांनीही आपण अगोदरच नगरमध्ये सभा घेण्याचे ठरवले असल्याचे सांगून, जेष्ठनेते अंकुश काकडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी असेल, असे स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सहा पैकी चार आमदार अजित पवार गटात गेले असले तरी, नव्याने पक्ष संघटना वाढवा, तरुणांना जास्त संधी द्या. आमदार गेले असले तरी जनता आपल्या सोबत आहे, त्यामुळे पक्ष बांधणीवर जोर द्या, असे शरद पवार यांनी नगरच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. नगर जिल्ह्याचा मला सखोल अभ्यास असल्याने पक्ष भक्कमपणे उभा राहील, असा विश्वास शरद पवार यांनी दिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आल्याची माहीती आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT