India Meeting News : राहुल गांधी वडापाव खाणार, ममतादीदी पुरणपोळीची चव चाखणार, नितीश-लालूंची जोडी बाकरवडी संपवणार..

India Meeting in Mumbai : "यावेळी महाराष्ट्रीय परंपरेची ओळख असलेली तुतारी आणि नाशिक ढोलच्या वादनाने नेत्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. "
India Meeting News
India Meeting NewsSarkarnama

Mumbai News : भाजपविरोधक 'इंडिया' (India) आघाडीची अत्यंत महत्वपूर्ण बैठक राज्याची राजधानी मुंबईत पुढील दोन दिवस पार पडणार आहे. विरोधी बाकांवरचे नेते मुंबईत येत असून त्यांच्या पाहुणचारासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. या मंडळींच्या जेवणापासून हॉटेलमधील मुक्कामापर्यंत शाही व्यवस्था असणार आहे. नेत्यांच्या मेजवाणीत मुंबईचा प्रसिद्ध वडापावपासून ते कोल्हापुराचा तांबडा-पांढरा रस्स्यांपर्यंत अशा खाद्यपदार्थांचा सामावेश राहणार आहे. (Latest Marathi News)

India Meeting News
BJP Vs Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना भाजप त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन ललकारणार ; 'परिवर्तना'ची दहिहंडी उभारणार

या बैठकीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे स्वागत महाराष्ट्रीय पद्धतीने होणार आहे. विशेष म्हणजे मेजवाणीत मराठी पद्धतीच्या खाद्यपदार्थांना पसंती देण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या या बैठकीची चर्चा नेत्यांसाठी केलेल्या मेजवाणीच्या आयोजनसाठी अधिक आहे. पुरणपोळी, झणझणीत झुणका-भाकर, वडा-पाव असे विविध मराठी पदार्थ नेत्यांच्या डिनरमध्ये असणार आहेत. सकाळी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईच्या वडापाव खाणार आहेत, दुपारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पुरणपोळीची चव चाखणार आहेत, तर सायंकाळी नितीश कुमार-लालू प्रसाद यादव ही जोडी पुण्याच्या बाकरवडीचा आस्वाद घेणार आहेत.

तुतारी आणि नाशिक ढोल-

'आघाडी'च्या बैठकीसाठी मुंबईत उपस्थित राहणाऱ्या नेत्यांच्या आगमनावेळी महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रीय परंपरेची ओळख असलेली तुतारी आणि नाशिक ढोलच्या वादनाने नेत्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यामुळे नेत्यांना महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख घडवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे मुंबईतील आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

India Meeting News
Devendra Fadnavis यांचा NCP ला टोला | BJP | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Election

इंडियातील मेजवाणीतील मराठी पदार्थ -

वडापाव

बाकरवडी

नारळाची वडी

नाचणीचे वेफर्स

नारळपाणी

लिंबूपाणी

फळांचा ज्यूस

ज्वारीची भाकरी

India Meeting News
Ambadas Danve On Gas Price News : `चुनावी जुमला`, गॅस स्वस्त झाला ; ठाकरे गटाची टीका..

झुणका

काळा वाटाण्याची मिसळ

डाळिंब उसळ

मिर्ची ठेचा

मसाले भात

कोल्हापुरी पांढरा रस्सा

मालवणी प्रॉन्स करी

सूप आणि स‌ॅलेड

पुरणपोळी

दुधी मावा

मोदक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com