Gokul President Election Controversy; Shashikant Patil Chuyekar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shashikant Chuyekar: जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर शशिकांत चुयेकरांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले ‘लोकशाहीच्या दृष्टीने आमचाच विजय

Gokul Chairman Election: गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शशिकांत चुयेकर यांनी नाराजी व्यक्त केली. शासननियुक्त संचालकांच्या मतांवर आक्षेप घेत त्यांनी लोकशाहीच्या दृष्टीने आपलाच विजय झाल्याचा दावा केला.

सरकारनामा ब्यूरो

Gokul Election News: गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांचा मंगळवारी(ता. १० नोव्हेंबर) विजय झाला. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे शशिकांत चुयेकर यांचा पराभव झाला असून हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदा समोर येत नाराजी व्यक्त केली. लोकशाहीत आमचा पराभव झाला असला तरी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे अस त्यांनी अध्यक्षपदाच्या पराभवावर म्हटले आहे. शासननियुक्त सदस्यांमुळे त्यांचा अध्यक्ष बसल्याचे त्यांनी सांगितले.

गोकुळ निवडणुकीच्या निकालात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीचे १३ संचालक तर महायुतीच्या पॅनलचे १२ संचालक निवडून आले होते. मात्र, अध्यक्षपदासाठीचा कोरम पूर्ण होत नसल्याने चार शासन नियुक्त सदस्यांचा समावेशाचा अध्यादेश सरकारने काढला होता. आज झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत या सदस्यांच्या मतांमुळे महायुतीच्या राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर महायुती आणि समविचारी आघाडीत जोरदार शा‍ब्दिक खंडाजगी पाहायला मिळाली.

समविचारी आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांनी पराभव झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. गोकुळच्या निवडणुकीत लोकांनी २५ संचालकांना निवडून दिलं होत, त्यापैकी १३ मते मला मिळाली, शासननियुक्त संचालकांची मतं ही त्यांना मोजल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा चेअरमन जाहीर केला आहे. लोकशाही पद्धतीनं आमचा विजय झाला आहे, तर ठोकशाही पद्धतीने त्यांचा विजय झाला आहे. अशी टीका त्यांनी महायुतीवर केली.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान आपच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. मात्र, निवडणूक यंत्रणेकडून आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा राहिलेली नाही,त्यामुळे आता आपला पूर्ण विश्वास न्यायदेवतेवर असून पुढील लढा आम्ही न्यायदेवतेच्या मंदिरात देऊ, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर महायुतीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी १६ विरुद्ध १३ मतांनी निवड झाली. तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना १३ मतांवर समाधान मानावे लागले. संचालक मंडळाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या होत्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र बदलले आणि महायुतीने गोकुळवर आपला अध्यक्ष बसवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT