

Gokul Dairy politics : गोकुळ दूध संघाची सत्ता अखेर महायुतीच्या ताब्यात गेली आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चारही संचालकांनी अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या पारड्यात आपले मत टाकले. त्यामुळे समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांना पराभव झाला. मात्र, त्या चार संचालकांमुळे चुयेकर यांचा पराभव झाला, त्या संचालकांचे भवितव्य कोर्टाच्या निकालावर अवलंबून असणार आहे.
मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सक्रिट बेंचसमोर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पुन्हा गोकुळ प्रकरणाची सुनावणी होणार आहे. चुयेकर यांनी चार संचालकांना दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर आक्षेप घेतला आहे. या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला असला तरी हा वाद अजूनही कोर्टासमोर आहे. त्यावर कोर्टात सविस्तर सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या अंतिम निकालावर गोकुळचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
महायुतीचा प्लॅन तयार
कोर्टाने सरकारचा वटहुकूम रद्द केल्यास किंवा चार सदस्यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरविल्यास पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा निर्माण होऊ शकतो. याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचक विधान केले आहे. दुर्देवाने कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास पुन्ही तीच स्थिती निर्माण होईल. बारा संचालक बैठकांना अनुपस्थित राहतील आणि प्रशासक नेमावा लागेल, असे स्पष्ट संकेत मुश्रीफ यांनी दिले आहेत.
प्रशासक नेमल्यास महायुतीच सत्ता राहील, कारण राज्यात आमची सत्ता आहे, असे सांगण्याचा प्रयत्नही मुश्रीफ यांनी केला आहे. समविचारीच्या १३ संचालकांनाही त्यांनी एकप्रकारे गर्भित इशारा दिला आहे. त्या संचालकांची आजची शेवटची सभा असेल. कारण प्रशासक नेमल्यास आमचेच संचालक राहतील, असे मुश्रीफ म्हणाले आहेत. मुश्रीफ यांच्या या विधानामुळे कोर्टाच्या निकाल महायुती आणि सतेज पाटील यांच्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी महत्वाचा असणार आहे.
कोर्ट काय निकाल देणार?
सरकारने काढलेल्या वटहुकुमावर कोर्ट एका सुनावणीत निकाल देणार नाही. सरकार आणि समविचारी आघाडीकडून जोरदार युक्तिवाद होईल. त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत महायुतीच सत्ता असणार आहे. पण कोर्ट नेमका निकाल काय देणार, यावरही महायुतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. कोर्ट संचालकांची नियुक्ती बेकायदेशीर ठरविणार की त्यांना दिलेल्या मतदानाचा अधिकार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. त्यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.