Sasoon Hospital sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sasoon Hospital News : "ससून हॉस्पिटल की भ्रष्टाचाराचा अड्डा?"

Pune Accident News in Marathi : "ससून हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलाचं ब्लड सॅम्पल बदलण्याच्या बाबतीत प्रकरण झाले. हे प्रकरण बाहेर आल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे."

Umesh Bambare-Patil

Satara News, 28 May : ससून हॉस्पिटल आता गरिबांचं नसून भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. या भ्रष्टाचाराच्या बाबतीत गेल्या वर्षभरात झालेल्या संदर्भाने या सर्व प्रकरणांची 'सीबीआय'मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) आमदार आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

आमदार शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) यांनी 'एक्स' अकाउंटवर ट्वीट करत म्हटलं, "ससून हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलाचं ब्लड सॅम्पल बदलण्याच्या बाबतीत प्रकरण झाले. हे प्रकरण बाहेर आल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे. परंतु, या प्रकरणात ज्या लोकांची नावे आले आहेत, ते डॉक्टर गेल्या अनेक वर्षभरापासून ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत."


(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"औषधांचा भ्रष्टाचार, औषधांबद्दल तक्रारी, ललित पाटील प्रकरण, रुबी आणि ससून हॉस्पिटल किडनी रॅकेट प्रकरण असेल. गरिबांच्या किडन्या श्रीमंतांना विकण्याचा जो प्रकार होता, त्यामध्ये रुबी हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटल वर कारवाई करण्याबाबतचा निर्णय झाला का? याबाबत गुन्हे दाखल झाले होते. परंतु, पुढे काय झाले?" असा सवाल शशिकांत शिंदेंनी उपस्थित केला आहे.

"डॉक्टरांना बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करणार असे सांगण्यात आले. हा विषय मी विधान परिषदेत देखील मांडला होता. हा विषय मांडूनही ही या हॉस्पिटलमधील ज्या डॉक्टरांची नावे आली आहेत. त्या डॉक्टरांना काही लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सभागृहात याची चौकशी करू आणि अहवाल करून कारवाई करू, अशा प्रकारची ग्वाही आम्हाला दिली होती. पण, चौकशीचा अहवाल यायच्या अगोदर रुबी हॉस्पिटल मानव अवयव प्रत्यारोपण सुरू करण्यात आलं होतं. हे सर्व चौकशीचा अहवाल यायच्या अगोदर पुन्हा सुरू झालं. संबंधितांवर कोणताही गुन्हा अथवा कारवाई न करता त्यांना दिलासा देण्यात आला. बडतर्फ डॉक्टरांना त्याच ससून हॉस्पिटलमध्ये पोस्टिंग देण्याचा धाडस कोणी केले, याची चौकशी होणे गरजेचे आहे," अशी मागणी शशिकांत शिंदेंनी सरकारकडे केली आहे.

"आमच्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि ते मनात ठेवून काही लोकांचे धाडस वाढत आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये होणारे प्रकरण, खोटी सर्टिफिकेट असे अनेक प्रकार गरिबांना न्याय मिळण्याच्याऐवजी अधिकार काढून घेण्याचे पाप करत आहे. ज्या डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. त्या डॉक्टरांना पुन्हा रुजू करण्यात आलं. यामध्ये राज्य सरकारमधील बऱ्याचशा मंडळींचा सहभाग असून त्यांनी या भ्रष्ट डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रुबी हॉस्पिटल आणि डॉक्टरांकडून आर्थिक तडजोड झाली आहे, अशा प्रकारची चर्चा आहे," असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलं.

"त्यामुळेच डॉक्टरांचे धाडस वाढले असून यासारखी असंख्य प्रकरणे घडत आहेत. याची 'सीबीआय'मार्फत चौकशी व्हावी आणि गरिबांच्या हॉस्पिटलला त्यांचा अधिकार हक्क मिळावा. भ्रष्टाचारी आणि आरोप असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी. नाहीतर हीच मंडळी ससून हॉस्पिटलमध्ये भेटून हीच मंडळी भ्रष्टाचार करतील आणि गरिबांवर अन्याय करतील. या सर्व प्रकरणात राज्यातील एक मोठ्या मंत्र्याने, एका आमदाराने आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ नेत्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाली अशी चर्चा खूप जोरात होत आहे. याची सत्यता जनतेला कळणे गरजेचे आहे," असंही शशिकांत शिंदे म्हणाले.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT