NCP MLA Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : युरोप दौऱ्यावरुन शशिकांत शिंदेंनी काढले संचालकांना चिमटे...

Shashikant Shinde आमदार शिंदे म्हणाले, अभ्यास दौरा हा केवळ जिल्हा बॅंकेचाच असतो असे नाही. राज्य सरकारच्यावतीने विधानसभा व परिषदेचे सदस्य ही जात असतात.

Umesh Bambare-Patil

Satara NCP News : सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक नुकतेच युरोपच्या अभ्यास दौरयावरुन परत आले. या दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी संचालकांना चिमटे काढले. परदेश दौऱ्यावर जाणं हे चांगलं आहे. पण, तेथील योजना जिल्ह्यात राबविण्याच्या उपाय योजना संचालकांनी कराव्यात. तरच लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसेल. जिल्हा बॅंकेतील संचालक माझ्यापेक्षा जास्त अभ्यासू असल्याने त्यांना चांगल्या पद्धतीने बॅंकिंग क्षेत्रात बदल करता येतील, असे त्यांनी म्हटले आहे.

सातारा जिल्हा बॅंकेचे Satara DCC Bank संचालक युरोपच्या अभ्यास दौरयावर जाऊन आले. या दौऱ्यावर रयत क्रांती संघटनेने आक्षेप घेत नेमका कोणता अभ्यास केला हे संचालकांनी सभासदांपुढे मांडावे अशी मागणी केली. त्यानंतर याच विषयावरुन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनीही Shashikant Shinde जिल्हा बॅंकेच्या संचालकांना कानपिचक्या दिल्या.

आमदार शिंदे म्हणाले, अभ्यास दौरा हा केवळ जिल्हा बॅंकेचाच असतो असे नाही. राज्य सरकारच्यावतीने विधानसभा व परिषदेचे सदस्य ही जात असतात. बाहेरच्या देशातील योजना, बॅंकिंग क्षेत्रात नवीन नवीन काय असेल त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी बॅंकेला संचालकांच्या कुटुंबांचा खर्च करता येत नाही. पण, संचालकांचा खर्च बॅंक करते.

कृषी विभागाकडून अनेक शेतकरी परदेशात दौऱ्यावर जात असतात. त्यामुळे परदेश दौऱ्यावर जाणं हे चांगलं आहे. त्याचा अभ्यास करुन त्या पद्धतीच्या योजना जिल्ह्यात राबवताना काय करता येईल, याच्या उपाय योजना संचालकांनी कराव्यात. म्हणजे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसेल. जिल्हा बॅंकेतील सगळी मंडळी माझ्यापेक्षा जास्त अभ्यासू असून त्यांना चांगल्या पद्धतीने बॅंकिंग क्षेत्रात बदल करता येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT