Shashikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagpur winter session : शशिकांत शिंदे साताऱ्यातील रखडलेल्या कामांवरुन अधिवेशनात आवाज उठवणार ..

Pending Satara Development Work : सातारा मेडिकल कॉलेज, सिंचन प्रकल्पांची 100 कोटींच्या कामांचा समावेश.

Umesh Bambare-Patil

Nagpur Winter Session : सातारा जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज, सिंचन प्रकल्पांचा 100 कोटींच्या निधी अभावी रखडलेल्या विकास कामांवरून  जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक भूमिका घेणार आहेत. याबाबत शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा Satara जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. या सातारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम निधी अभावी रखडले आहे. अनेक सिंचन प्रकल्पांची कामे मंजूर असून त्याला निधीची तरतूद झाली आहे. पण निधी उपलब्ध करण्यात शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे सरकार अपयशी ठरले आहे, असे सांगून शशिकांत शिंदे Shashikant shinde म्हणाले, या सातारा जिल्हयात अनेक विकासकामे सुरू आहेत.

यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विविध सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. या कामांसाठी निधी मंजूर आहे, पण तो वेळेत उपलब्ध केला जात नाही, निधी देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याबाबत उद्यापासून नागपूरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील आमदार आक्रमक होत आवाज उठवणार आहेत.

अवकाळी नुकसानभरपाई, प्रोत्साहन अनुदान वाटपात मोठ्याप्रमाणात शेतकरी प्रलंबित आहेत. दुष्काळ उपाय योजनाकडे झालेले दुर्लक्ष या बाबीही आक्रमकपणे आम्ही मांडणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

Edited By : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT