Maratha Reservation : आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील खासदारांनी लोकसभेत आवाज उठवावा : संभाजीराजे घेणार बैठक

Sambhajiraje Chhatrapati संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील खासदारांना पत्र लिहिले आहे.
Sambhajiraje chhatrapati
Sambhajiraje chhatrapatisarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा युवक आंदोलनात सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लाोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदारांनी आवाज उठवावा, अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. लवकरच ते नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदारांची एकत्रित बैठक घेणार आहेत.

यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती Sambhajiraje chhatrapati यांनी महाराष्ट्रातील खासदारांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की, मराठा समाज आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीसाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. यासाठी अनेक मोर्चे, आंदोलने, उपोषणे झाली. काही युवकांनी आत्महत्या सारखा टोकाचा मार्ग घेतला.

Sambhajiraje chhatrapati
Satara News : मोदी सरकारमुळेच नौदलाच्या ध्वजावर 'शिवमुद्रा'.

यावरुन मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरीही अतिशय शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने हा समाज पुढे चालला आहे. मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देवून २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने तर २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण .दिले होता. मात्र, हे आरक्षण कायदेशीर पातळीवर टिकले नाही.

संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले की, मी स्वतः २००७ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती करत आहे. अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत काही आंदोलने स्वतः देखील केली आहे. राज्यसभा सदस्य असताना सभागृहात देखील हा विषय सविस्तर पणे मांडला होता. तसेच संसद परिसरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन ही केले होते.

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाचे लाखो युवक हे देखील आंदोलनात सहभाग घेत आहेत. या पार्श्वभूमीवर माझी महाराष्ट्रातील खासदारांना कळकळीची विनंती आहे त्यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा.

Sambhajiraje chhatrapati
विनायक राऊतांची मराठा आरक्षणासाठी अमित शहांकडे विनंती | Vinayak Raut | Maratha Reservation

या विषयी लवकरच नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदारांनी एकत्रित मराठा आरक्षण मिळवण्याबाबत ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीचे सविस्तर निमंत्रण खासदारांन देणार आहे. आरक्षण मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत ,असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

Sambhajiraje chhatrapati
Satara Political News : उदयनराजेंचे कुठं कुठं मन लागत नाही, याची खासगीत माहिती द्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com