Shashikant Shinde in Mumbai NCP Melava Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : शशिकांत शिंदेंची तोफ मुंबईत धडाडली; म्हणाले, जावळीकरांनो भाजपचे स्वार्थी राजकारण संपवा...

Shashikant Shinde नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील मुंबई स्थित जावळीकरांच्या जनसंवाद मेळाव्यात आमदार शिंदे बोलत होते

Umesh Bambare-Patil

-संदीप गाडवे

Mumbai NCP News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे सक्रिय झाले असून त्यांनी मुंबईतील कोपरखैरणे येथील मुंबई स्थित जावळीकरांशी संवाद साधताना भाजपवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, १० वर्षात भाजपने राज्याला, सातारा जिल्ह्याला काय दिले याचा अभ्यास जनतेने करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी करून भाजपचे स्वार्थी राजकारण कायमचे संपवावे, असे आवाहन केले.

जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP नेते दीपक पवार यांच्या वतीने नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील मुंबई Mumbai स्थित जावळीकरांच्या जनसंवाद मेळाव्यात आमदार शिंदे Shashikant Shinde बोलत होते. यावेळी दीपक पवार, राजेंद्र धनावडे, भानुदास भोसले, बाजीराव धनावडे, प्रा. रघुनाथ शेलार ,श्रीकृष्ण शेलार, सुयोग बेलोशे, आदींची उपस्थिती होती.

आमदार शिंदे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी मोदींचे नाव वापरून भाजपने सत्ता मिळवली. मात्र या सत्तेच्या माध्यमातून सामान्य जनतेची कामे करण्याऐवजी भाजपने सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना विनाकारण त्रास देण्याचे काम भाजपने केले.

सुडाचे राजकारण कधीच टिकत नाही.मोदींचा करिष्मा आता ओसरत चालला आहे.भाजपच्या काळात महाराष्ट्र ,साताऱ्याला काय मिळाले. प्रलंबित प्रश्न तसेच भिजत ठेवले आहेत. राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार हे वयाच्या ८३व्या वर्षी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत."

पवार साहेबांच्या सभांना जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकदिलाने काम करून परत एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आणणार आहे. शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून कार्यकर्यांनी गावोगावी पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचे काम केले पाहिजे.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT