Ahmednagar News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shevgaon Robbery : शेवगाव हादरलं ; दरोड्यात व्यापारी कुटुंबातील दोघांचा मृत्यू

Ahmednagar News : . दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Crime News : शेवगांव शहर आज (शुक्रवार) पहाटे दरोड्यानं हादरलं. भर वस्तीत मारवाड गल्ली हा प्रकार घडला. यात दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

शेवगाव शहरातील बाजारपेठेमध्ये राहत्या घरी रात्री तीन ते चारच्या दरम्यान दरोडा पडला. भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगा किशन बलदवा (वय 55) यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

दरोडेखोरांनी गोपी किशन गंगा किशन बलदवा व त्यांच्या मोठ्या वहिनी पुष्पा हरिकिशन बलवा (वय 65) यांना निर्घृण मारहाण केल्याचे दिसते. या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला. त्याचबरोबर सुनिता गोपीकिशन बलदवा या घटनेमध्ये जखमी झाल्या आहेत. त्यांची परिस्थिती गंभीर आहे.

या घटनेची माहिती कळल्यानंतर घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती घेतल्यानंतर ते म्हणाले, "शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भागांमध्ये दरोडा पडणे आणि त्यात दोन जणांचा मृत्यू होणे ही मोठी गंभीर घटना आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करावा आणि आरोपींचा शोध घ्यावा," शहरांमध्ये या पद्धतीने गंभीर गुन्हे होणे होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, विहिरीत चार जणांचे मृतदेह आढळल्याने पाथर्डी तालुका हादरला आहे. माळीबाभुळगाव येथे विहिरीत हे मृतदेह आढळले आहेत. एक महिलेसह मुलगा व दोन मुली असे चौघांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला संशयावरून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सागडे, मुलगी निषीधा व संचिता असे राहत होते. धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला. यावेळी इतरांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला. गुरुवारी पहाटे या चौघांचे मृतदेह आढळले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT