Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेवर मुंबई महापालिकेने (BMC) बुलडोजर फिरवला आहे. चाळीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या शिवसेना शाखेचे कार्यालय जमीनदोस्त झाल्यानं ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. (Shiv Sena Uddhav Thackeray Shakha Demolish by bmc)
मुंबईतील वांद्रे (Bandra ) परिसरात असलेली ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. या शाखेत ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरचे कार्यालय होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना ही शाखा स्थापन केली होती
मुंबई महापालिकेच्या कारवाईवेळी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही गटात शाब्दीक वाद होण्याची परिस्थिती होती, पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं वाद टळला. 40 वर्षे जुनी असलेल्या या शाखेवर बुलडोजर चालवून कारवाई करण्यात आलेबद्दल शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
"ही शाखा काही आज एका रात्रीत उभा राहिली नाही. या शाखेतून अनेक नगरसेवक, आमदार, खासदार निवडून गेले आहेत. आज सत्तेत असलेले लोक (शिंदे गट) ज्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात, ते बाळासाहेबही कधीतरी येथे आले गेले असतील. अशा शाखेवर कारवाई करताना यांना काहीच वाटले नाही? असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद सदस्य सचिन अहीर यांनी केला आहे.
1995 च्या झोपड्यादेखील आपण अधिकृत केल्या आहेत. ही शाखा 40 वर्षे जुनी आहे. मग 40 वर्षे जुनी शाखा अनधिकृत आहे, असं महापालिका कसं म्हणू शकते?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला आहे. ते म्हणाले, "गद्दार आणि मिंधे लोक सूड भावनेनं कारवाई करत आहेत. हे योग्य नाही,"
शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनीही शाखेवर झालेल्या कारवाईचे समर्थन करत प्रतिक्रिया दिली आहे. एखादी इमारत, कार्यलय जुने आहे म्हणजे ते ऐतिहासिक होत नाही. जर ते अनधिकृत असेल आणि त्या त्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई होत असेल तर ती योग्य आहे. जे जे अनधिकृत आहे ते ते हटविण्यात यावे, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.