<div class="paragraphs"><p>Shilpa Shetty, Raj Kundra</p></div>

Shilpa Shetty, Raj Kundra

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

साडेसाती फेडण्यासाठी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा शनी दर्शनाला

विनायक दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) : धोकाधडी तसेच अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणी राज कुंद्रा ( Raj Kundra ) जामिनावर बाहेर आहे. त्यांने काल ( मंगळवारी ) पत्नी शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty ) सह शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदेवांची पूजा केली तसेच मनोभावे दर्शनही घेतले. या आधी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील वणी येथे जाऊन सप्तश्रृंगी देवीचेही दर्शन घेतले. Shilpa Shetty, Raj Kundra to Shani Darshan

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी पती राज कुंद्रा व मैत्रिणीसह शनिशिंगणापूरला भेट देवून स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतले.या भेटी दरम्यान चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मंगळवारी (ता. 4) सप्तश्रृंगी देवीचे दर्शन आटोपून त्या आपल्या एम.एच.02 एफ.सी. 0010 या मर्सेडिझ बेंझ पांढऱ्या मोटारीतून शनिशिंगणापूरला रात्री आठ वाजता आल्या. मुख्य रस्त्यावरुनच त्यांच्या मोटारीमागे चाहत्यांचा घोळका लागला होता. शिल्पाने लाल रंगाचा डिझायनर पंजाबी ड्रेस तर राजने लाल शर्ट व काळ्या रंगाची पँट घातली होती. मोटारीतून उतरताच त्यांनी सर्व चाहत्यांना हात जोडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

उदासी महाराज मठात पती पत्नीने कौटुंबिक सुखासाठी संकल्प सोडून तेल अभिषेक अभिषेक केला.त्यांनी शनिचौथ-याखालून दर्शन घेतले. पौरहित्य मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी केले. जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन शिल्पा व राज कुंद्रा यांचा सत्कार केला. येथील दर्शनाने मोठी उर्जा मिळत असल्याने कुटुंबासह दरवर्षी येते. कोरोनामुळे दोन वर्ष वारी चुकली होती.येथून बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणार आहे, असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला. यावेळी सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे व क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष सतीश पालवे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT