Mahesh Shinde, Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon : शिंदे सरकारचे महेश शिंदेंना गिफ्ट; कोरेगाव नगरपंचायतीला दिले २० कोटी

माजी मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai, कोरेगावचे आमदार Koregaon MLA महेश शिंदे Mahesh Shindeयांनीही सत्ता बदलात महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे दिसून आले.

सरकारनामा ब्यूरो

कोरेगाव : राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी होऊन नव्याने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने कोरेगाव नगरपंचायतीस पाहिली भेट म्हणून विविध नागरी विकासकामांसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

जिल्ह्याचे सुपुत्र आणि तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व अपक्ष अशा सुमारे ५१ आमदारांनी बंड केल्यामुळे राजकीय उलतापालथ झाली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होऊन नवीन सरकार सत्तेत आले. त्यात जिल्ह्यातील तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनीही महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे दिसून आले.

या भूमिकेचे विकासकामांसाठी निधीच्या रूपात बक्षीस म्हणून शिंदे सरकारच्या नगरविकास विभागाने आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे घोडदौड करणाऱ्या कोरेगाव नगरपंचातीस "नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य" या योजनेंतर्गत २० कोटी निधी मंजूर केला आहे.

या निधीमधून जवाहर भोसले ते भानुदास बर्गे - फुलाई मंगल कार्यालय परिसरातील रस्त्यांसाठी एक कोटी ७५ लाख, बर्गे घर ते जगताप घर रस्ते काँक्रीटीकरण व गटारसाठी एक कोटी ७५ लाख, प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन चार व सहामधील रस्त्यांसाठी व गटारसाठी प्रत्येकी एक कोटी ५० लाख, प्रभाग सातमधील रस्त्यांसाठी व गटारसाठी एक कोटी, प्रभाग आठमधील रस्त्यांसाठी ५० लाख, प्रभाग १२ मधील रस्त्यांसाठी एक कोटी, याच प्रभागातील रस्ते व गटार बांधकामासाठी ५० लाख.

प्रभाग १३, १४ व १५ मधील रस्ते व गटार बांधकामासाठी प्रत्येकी एक कोटी ५० लाख, प्रभाग १६ मधील काँक्रिट रस्ते व बंदिस्त गटार बांधकामासाठी एक कोटी ५० लाख निधी मंजूर केल्याची माहिती कोरेगाव नगर विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे, नगराध्यक्षा दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT