Pandharpur, 09 August : राज्यातील मराठा समाज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. मात्र त्यांनी आपल्या मंत्र्यांना आवर घातली पाहिजे. जर मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला, तर त्यांचा पूर्ण पक्ष उघड्यावर पडेल, अशा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. या निमित्ताने जरांगे पाटील रविवारी (ता. 9 ऑगस्ट) पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले, सत्ता आणि बहुमताच्या जोरावर सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात राजकारणाची मस्ती गेली आहे. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट रचला जातोय. या सरकारचा माज उतरवणे, हीच आमची पुढची दिशा असेल, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी उमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून चूक सुधारण्याचे फोन येत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही चुक सुधारायला तयार नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. फडणवीस यांंनी बावनकुळे यांच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय सुरु केला आहे. त्यांनी केलेली चूक फडवणीस यांनी मान्य करायला हवी. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे वाटणाऱ्या नेत्यांना आता जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आही आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिली.
कोल्हापूरमध्ये तब्बल 3 लाख नोंदी सापडल्या असून साडेसहा लाख मराठा समाज आरक्षणात जाऊ शकतो. 58 लाख नोंदी देण्याचे कबूल केले असले तरी सातारा आणि औंध गॅझिटियरमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावचे नाही, असा कट सरकारने रचला आहे. मंत्रिमदाच्या गैरवापर करुन मराठा समाजाचे वाटोळे करण्याचे काम सुरु आहे. मात्र 29 ऑगष्ट रोजी होणाऱ्या आंदोलनानंतर पुन्हा कोणीही मराठ्यांचे दाखले रद्द करण्याचे धाडस करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्रिपदाचा गैरवापर केला जात आहे : जरांगे पाटील
पंढरपूर दौऱ्यावर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर विठुरायाला आपण काय साकडे घातले असे विचारले असता, त्यांनी विठुरायाला साकडे घालणार नाही. कृतीतून दाखवून दिले जाईल. सत्तेतील लोक आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत. मराठा समाजाचे वाटोळे करुन ओबीसीचे भले करत आहेत. कोणाचेही त्यांनी वाटोळे करु नये. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे भाजप अडचणीत आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पवारांच्या दोन आमदारांनी घेतली भेट
मनोज जरांगे पाटील येथील विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते. दोन्ही आमदारांनी जरांगे पाटील यांचे स्वागत करुन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.