Sadashiv Lokhande News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadashiv Lokhande News: ३३ वर्षांत वाढदिवस साजरा न करणारे खासदार लोखंडे घाटमाथ्याच्या लढाईसाठी सज्ज...

Pradeep Pendhare

महेश माळवे

Nangar: नगर जिल्ह्यात १९९० पासून काम करत आहे. कर्जत-जामखेड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ३३ वर्षांच्या राजकारणात कधीही वाढदिवस साजरा केला नाही. मात्र, कमलाकर कोते व मित्रमंडळींनी आपण एकषष्ठी साजरी करण्याची रट लावली. त्यामुळे आज आपला अभीष्टचिंतन सोहळा होत असल्याचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. अभिष्टचिंतन सोहळ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार लोखंडे यांनी निळवंडे, समन्यायी पाणी वाटप व घाटमाथ्यावरील पाण्यासंदर्भात दिलखुसासपणे चर्चा केली.

खासदार लोखंडे म्हणाले, "आपल्या खासदारकीच्या साडेनऊ वर्षाच्या कार्यकाळात लोकांचे प्रेम मिळाले. १७ दिवसांत खासदार होण्याचे भाग्य श्रीरामपूरकरांच्या प्रेमामुळे आपल्याला मिळाले. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आमदारकीसाठी आपल्याला आणले होते. मात्र, राजकीय घडामोडीमुळे आपण खासदार झालो. २०१४ ला मुरकुटे सोबत, तर २०१९ ला ते विरोधात होते. त्याचप्रमाणे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे २०१४ ला विरोधात, तर २०१९ ला सोबत काम केले". आता २०२४ ला मुरकुटे व विखे दोघेही आपल्या समवेत आहेत. राजकारणात कधीही काहीही घडामोडी घडतात, असेही खासदार लोखंडे म्हणाले.

२००५ ला झालेल्या समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे नगर जिल्ह्यातील पाणी प्रश्न निर्माण झाला. नगर व नाशिक जिल्ह्यात ८० टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. मात्र, एकट्या जायकवाडीची क्षमता १०९ टीएमसी आहे. हा कायदा करताना ६५ टक्के धरण भरले नाही, तर नगर-नाशिकच्या धरणांमधून खाली पाणी सोडावे लागते. अशापद्धतीने ३० ते ५० टीएमसी पाणी खाली सोडले, तर या भागाला तिसरे व चौथे रोटेशन मिळणे मुश्कील आहे. २००५ च्या समन्यायी कायद्यानुसार, असे पाणी गेले तर आपले वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, अशी भिती खासदार लोखंडे यांनी बोलवून दाखवली.

मराठवाड्याला न्याय देताना व आपल्यावरील अन्याय दूर करताना समुद्राला वाहून जाणारे घाटमाथ्याचे ११५ टीएमसी पाणी आडविले, तरच आपल्याला २० ते २५ टीएमसी पाणी मिळू शकते. आज मुळा धरणात पाणी दिसत असले तरी नगर व सुपा एमआयडीसी, छावणी परिसराला पाण्याचे आरक्षण वाढले तर मुळातही तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे मुळासाठीही अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. ४० ते ५० वर्षांपासून निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत होते. निळवंडेच्या कालव्यातून पाणी आल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. हे होत असताना एकीकडे निळवंडेचे जलपूजन सुरू होते. मात्र, आम्ही टेलचा भाग असलेल्या चितळी गावात भूमिपूजन करत होतो. आपण टेलपर्यंत पाणी आणून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद आणू शकलो. निळवंडे परिसरातील १८२ गावांना न्याय देण्याची भूमिका आपली सातत्याने राहिली आहे. निळवंडेची जिंकली, आता लढाई घाटमाथ्याची आहे. सर्वांनी एकत्रितपणे हा लढा लढावा लागणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.

विलासराव देशमुखांचा दबाव अन्...

अवर्षणग्रस्त नगर जिल्ह्याला इंग्रजांनी न्याय दिला, धरण कालव्यांची निर्मिती करून शेतीच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. पण आपल्या लोकांनी ते पाणी घालविले. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्याने त्यांनी दबावाचा वापर करून मराठवाड्याला पाणी नेले. यावेळी चर्चा न होता समन्यायी कायदा मंजूर झाला. मराठवाड्यातील आमदार नगर, नाशिकच्या आमदारांना वरचढ ठरले. पंधरा वर्षे आपण दुष्काळी कर्जत-जामखेड भागाचा लोकप्रतिनिधी होतो. त्यामुळे पाण्याचे महत्व समजते. लोक इतर कशालाही विसरतील, पाण्याला विसरणार नाही.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT