Sanjivkumar sawant
Sanjivkumar sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी; म्हणून शिवसैनिकाची सहपत्नीक सांगली ते पंढरपूर पायीवारी

भारत नागणे

पंढरपूर : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईत दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्यांना आराम मिळावा, यासाठी सांगली जिल्ह्यातील बनाळी येथील शिवसैनिक संजीवकुमार सावंत आणि त्यांच्या पत्नी रुपाली सावंत यांनी 80 किलोमीटर अंतर अनवाणी पायी येऊन पंढरीची वारी केली. (Shiv Sainiks pray to Panduranga for the health of Chief Minister Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी होवून त्यांना निरामय आरोग्य लाभावे असे जत तालुक्यातील बनाळी येथील शिवसैनिक संजीवकुमार सावंत यांनी विठ्ठलाला साकडे घातले होते. त्यानुसार संजीवकुमार सावंत यांनी तीन दिवसांत अनवाणी 80 किलोमीटरचे अंतर पार करत पंढरीची वारी पूर्ण केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची विठ्ठलावर अढळ श्रद्धा आहे. हीच भावना मनात ठेवून संजीवकुमार सावंत या शिवसैनिकाने आपल्या नेत्याप्रती असलेल्या प्रेमापोटी सहपत्नीक पंढरीची पायी वारी पूर्ण करुन नेत्याला दीर्घारोग्य लाभू दे असे विठ्ठलाला साकडे घातले.

विठ्ठालाचा प्रसाद म्हणून तुळशीची माळ आणि चंद्रभागेचे तीर्थ घेवून मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचा मनोदयही सावंत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी संजीवकुमार सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी पंढरपूरची पहिली पायी वारी केली होती. त्यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून चंद्रभागेचे तीर्थ दिले होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला संजीवकुमार यांना उपस्थित राहण्याचे खास निमंत्रण देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या निरामय आरोग्यासाठी पायी पंढरीची वारी करणाऱ्या सावंत दांपत्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या या पायी वारीत साहेबराव‌ पाटील, महेश यादव, रघुनाथ कोडग, मारुती कोडग, तुकाराम जाधव, गणेश सावंत, दत्तात्रेय लिगाडे, राहुल पाटील आदी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT