मी एकनाथ शिंदेचा लाडका, म्हणूनच विकासकामांसाठी निधी मिळतो

(Shivsena Mla Sanjay Sirsath) मला अनेकजण म्हणतात शिरसाट साहेब नेहमी मुंबईलाच असतात. पण मुंबईला गेल्याशिवाय कामे होत नाहीत. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी आणणे सोपी गोष्ट नाही.
Minister Eknath Shinde-Mla Sanjay Sirsat
Minister Eknath Shinde-Mla Sanjay SirsatSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः मी तिसऱ्यांदा आमदार झालोय, आता कुठे विकासकामाला गती आली आहे. आता केलेली काम दहा वर्षात का केली नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तो सहाजिकच आहे. पण पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात होतो, तर गेली पाच वर्ष युतीत गेली. आता कुठे सत्ता आणि नगरविकास खाते शिवसेनेकडे आले आहे. त्यात मी एकनाथ शिंदेचा लाडका असल्याने त्यांना पटवतोच, म्हणून मतदारसंघाला निधी मिळत आहे, अशा शब्दात पश्चिम मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी होत असलेल्या विकासकामांचे श्रेय एकनाथ शिंदेना दिले.

महापालिका आयुक्तांनी एक रुपया तरी दिला असता का? असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला. मतदारसंघातील नव्याने महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या सातारा देवळाई भागात संजय शिरसाट यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळे सुरू केल आहेत. नुकतेच त्यांनी माऊलीनगरसह परिसरातील ड्रेनेज लाईन व सिमेट रोडच्या कामांचा शुभारंभ केला.

यावेळी उपस्थितीत नागरिकांसमोर त्यांनी निधी आणण्यासाठी वारंवार मुंबईला कसे जावे लागते, भेटीगाठी घ्यावा लागतात याचे अनुभव कथन केले. संजय शिरसाट म्हणाले, या भागाचा विकास करण्याचा निर्धार मी केला आहे. इतर नेत्यांसारख फक्त घोषणा करायच्या आणि मग पुन्हा तिकडे फिरकायचेच नाही, हा माझा स्वभाव नाही. काम होणार असेल तर ते निश्चितच करणार, होणार नसेल तर ते देखील स्पष्ट सांगणे हा माझा स्वभाव आहे.

काहीकाळ समोरच्या व्यक्तीला राग येईल, तो बोलेल पण आपण खोटं बोललो असे तो म्हणू शकणार नाही. मला अनेकजण म्हणतात शिरसाट साहेब नेहमी मुंबईलाच असतात. पण मुंबईला गेल्याशिवाय कामे होत नाहीत. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी आणणे सोपी गोष्ट नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मी लाडका असल्यामुळे निधीसाठी त्यांना पटवतो आणि ते देखील देतात.

Minister Eknath Shinde-Mla Sanjay Sirsat
बाबासाहेबांनी राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली, माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा दिली…

गेल्या दहा वर्षातच या भागात अनेक काम व्हायला हवी होती. तुमची माझ्याकडून ती अपेक्षा निश्चितच असणार, त्यात चुकीचे काही नाही. पण विरोधी पक्षात पाच वर्ष गेली, नंतर युतीत गेली, आता कुठे हे खाते आपल्याकडे आले आहे. एकनाथ शिंदे त्या खात्याचे मंत्री असल्यामुळेच निधी मिळू शकतो आहे. महापालिकेच्या भरवशावर एवढी काम झाली असती का? असा सवाल देखील शिरसाट यांनी उपस्थितांना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com