Udayanraje
Udayanraje Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

...तर शिवसेना आणि महाराष्ट्र माझाच म्हणावा लागेल : उदयनराजे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेतील (Shivsena) बंडाविषयी प्रथम मला माहिती नाही म्हणणारे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje) यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला? शिवसेना सध्या कुणाची आहे, असे विचारताच ते उसळून म्हणाले कुणाची म्हणजे..? शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन केली म्हणून शिवसेना माझी आहे, असं मी म्हणायचं का..? तसं असेल तर माझीच म्हटलं पाहिजे. महाराष्ट्रही (Maharashtra) माझाच म्हटलं पाहिजे, अशा शब्दांत उदयनराजे यांनी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांवर हल्लाबोल केला. (Shiv Sena and Maharashtra belong to me, we have to say : Udayanraje)

कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेनेतील बंडाविषयी त्यांना विचारले असते, ते म्हणाले की, बंड झालं का.? तुम्ही सांगता म्हणून आम्ही ऐकतोय. शिवसेना आहेच की सध्या. शिवसेना कुणाची म्हणजे...? शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन केली; म्हणून शिवसेना माझी आहे, असं मी म्हणायचं का...? अरे व्वा...? मग माझीच म्हटली पाहिजे ना. महाराष्ट्रही माझाच म्हटलं पाहिजे... का नाही म्हणायचं?

लोकशाहीत आज संपूर्ण महाराष्ट्र हा जनतेचा आहे. कारण, जनतेच्या माध्यमातून आमच्यासारखे लोकप्रतिनिधी निवडून येतात. त्यामुळे छत्रपतींचा हा महाराष्ट्र अवघ्या लोकांचा आहे. इतर राजे आणि शिवाजी महाराज यांच्यात फरक एवढाच होता की, ते स्वतःला राजे म्हणायचे नाहीत. पण, जनतेचा राजा म्हणून जी ओळख आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे, असेही उदयनराजे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील सध्याच्या टीकाटिप्पणीवर बोलताना उदयनराजे म्हणाले की, मनात स्वार्थ बाळगून सत्तेसाठी एकत्र येतात, तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. जेव्हा स्वार्थ साधला जातो, तेव्हा ते आपापल्या मार्गाने निघून जातात. जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात, तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची ताकद वापरावी लागत नाही. कारण, त्यांचा विचार, उद्दिष्ठ एक असतं, त्यामुळे ते कायमस्वरूपी एकत्र राहतात. मला खात्री आहे की, आता राज्यात जे लोकं एकत्र आले आहेत, ते कायमस्वरुपी एकत्र राहणार. लोकांनाही ते पटलं असून त्यांनी ते स्वीकारलं आहे. प्रत्येकाला वाटतंय की आपण सत्तेत राहावं. पण सत्ता गेली का? याचं आत्मचिंतन केलं असतं तर आज आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, अशी टिप्पणीही त्यांनी विरोधी पक्षांवर विशेषतः शिवसेनेवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT