राष्ट्रवादीला शिरूर कोल्हेंसाठी नव्हे; तर पार्थ पवारांसाठी सुरक्षित करायचा आहे : आढळरावांचा गौप्यस्फोट

शिरूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे आंदण देण्याचा हा प्रकार आहे.
Amol Kolhe- Shivajirao Adhalrao Patil-Parth Pawar
Amol Kolhe- Shivajirao Adhalrao Patil-Parth PawarSarkarnama
Published on
Updated on

पारगाव (जि. पुणे) : शिवसेनेने (shivsena) माझा घरचा शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघ सोडून मला पुणे (Pune) मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करा, तसेच शिरूर मतदारसंघात फिरू नका, असे सांगितले. शिरूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे आंदण देण्याचा हा प्रकार आहे. मला दुसऱ्या मतदारसंघात पाठवून येथील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यासाठी नव्हे; तर पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यासाठी शिरूर मतदारसंघ सुरक्षित करायचा आहे, असा गौप्यस्फोट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Rao Adhalrao Patil) यांनी केला आहे. (NCP Wants To Secure Shirur Constituency For Parth Pawar: Shivaji Rao Adhalrao Patil)

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (ता. १२ ऑगस्ट) आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात गावभेट दौऱ्याचा प्रारंभ अवसरी बुद्रूक येथून केला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकाच्या मागील गेल्या अडीच वर्षांत शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. यापुढे मला खासदारकी किंवा इतर कोणतेही पद महत्वाचे नसून माझ्या शिवसैनिकांची कामे मार्गी लागली पाहिजेत. शिरूर लोकसभा मतदार संघातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे.

Amol Kolhe- Shivajirao Adhalrao Patil-Parth Pawar
पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाच्या वक्तव्यावर उदयनराजे म्हणाले...

एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी करत राज्याचे मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा देणारा संदेश आढळराव यांनी सोशल मीडियातून प्रसिद्ध केला होता. त्यानंतर शिवसेना नेतृत्वाकडून त्यांना त्या पोस्टसंदर्भात विचारणा झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर काही तासातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ती कारवाई मागे घेण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे यांनी आढळराव यांना मातोश्रीवर येऊन भेटण्याचे निमंत्रण दिले होते.

Amol Kolhe- Shivajirao Adhalrao Patil-Parth Pawar
मुख्यमंत्री शिंदेंचे निमंत्रण शिवसेनेचे आमदार स्वीकारणार का?

मातोश्रीवर भेटायला गेल्यानंतर कारवाईसंदर्भातील बातमीबाबत आढळराव यांची समजूत घालण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाऐवजी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आढळराव यांनी नाराजी व्यक्त करत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत बोलताना आढळराव यांनी पार्थ पवार यांचा संदर्भ दिला आहे.

Amol Kolhe- Shivajirao Adhalrao Patil-Parth Pawar
नाहीतर शिवसेनेचे सर्व आमदार आमच्यासोबत आले असते; केसरकरांचा गौप्यस्फोट...

आढळराव म्हणाले की, मला शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरण्याबाबतही निर्बंध घालण्यात आले होते. एक प्रकारे शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीला आंदण देण्याचा हा प्रकार होता. मात्र, मला दुसरीकडे पाठवून त्यांना पार्थ पवार यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित करायाचा आहे, असा गौप्यस्फोटही या वेळी बोलताना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com