Crime
Crime  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगरमधील शिवसेना नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - केडगाव येथे शिवसेनेच्या ( Shivsena ) दोन कार्यकऱ्यांची दिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक अमोल येवले यांना दुरध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. येवले यांनी धमकी संदर्भात कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली असून, त्यावरून आकाश पवार (रा. गोपाळगल्ली, केडगाव) याच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. ( Shiv Sena corporator in Ahmednagar threatened to be killed )

अहमदनगर महापालिकेतील नगरसेवक अमोल येवले यांनी तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी ( ता. 9 ) मध्यरात्रीच्या सुमारास माझ्या दुरध्वनीवर आकाश पवार याने संपर्क केला. दुरध्वनीवर बोलताना ''मी गुन्हेगार आहे. मला तुझी सुपारी मिळाली आहे. मी तुझा मर्डर करणार आहे," असा दम दिला. यानंतर येवले यांनी आकाश पवारचा चुलत भाऊ सचिन पवार याला दुरध्वनीवर संपर्क केला. त्यावर सचिन याने येवले यांना सांगितले की, ''आकाशला तुमच्या मर्डरसाठी तीन कोटी रुपयांची सुपारी मिळाली आहे''. येवले आणि सचिन पवारचा दुरध्वनी चालू असताना स्थानिक रहिवासी मिठू नेटके यांचा येवले यांना दुरध्वनी आला. यानंतर नेटके आणि येवले यांच्यात दुरध्वनीवर चर्चा झाली.

''आकाश तुम्हाला शोधत होता. दुरध्वनीवर करून त्याला बोलावून घे. मला त्याचा कार्यक्रम करायचा आहे'', असे म्हणत होता, अशी माहिती नेटके यांनी येवले यांना दिली. यानंतर येवले यांना अभिजीत कोतकर यांचा दुरध्वनी आला. कुठे काही भांडण झाले आहे का? असे त्याने विचारले. येवले यांनी त्यावर नाही म्हणून सांगितले. दुरध्वनी बंद केल्यानंतर कोतकर याचा पुन्हा दुरध्वनी आला. हॉटेल सागरवर चेहरा कपड्याने झाकलेले तिघे जण आले होते. अमोल येवले आहे का, असे त्यांनी विचारले. याठिकाणी खून होणार आहे, असे सांगून हॉटेलवर गोंधळ घालून ते निघून गेले, असे सांगितले. या सर्व प्रकाराची तक्रार येवले यांनी कोतवाली पोलिसांकडे केली आहे.

या तक्रार अर्जामुळे केडगाव परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. केडगावमधील दुहेरी हत्याकांडानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT