Chandrakant Patil  
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला

भाजप (BJP) सर्व निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवेल

सरकारनामा ब्युरो

सांगली : राज्यात भाजप(BJP) हा नंबर एकचा पक्ष बनला आहे. शिवसेनेने (Shivsena) मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला. हे अजूनही त्यांच्या लक्षात आले नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकांत भाजपने २१ जागांवर बहुमताने विजय मिळवला. त्यामुळे भाजप राज्यात १ नंबरचा पक्ष झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला १७ जागा मिळाल्या तर शिवसेनेला केवळ १२ जागांवर समाधान मानाने लागले. मुख्यमंत्रिपदासाठी सेनेने आपला पक्षच संपवला, असा पुनरुच्चार त्यांनी केला. याचदरम्यान, गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाही. असो, हा त्यांचा प्रश्न आहे. यापुढे भाजप सर्व निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवेल, अशी घोषणाही यावेळी चंद्रकांत पाटलांनी केली.

राजकरणात जे घडते ते आपल्या फाद्याचेच ठरते. आगामी काळातील पोटनिवडणुकीत राज्यातील १०५ नगर पंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवायच्या. आवश्यकता वाटल्यास काही ठिकाणी जिल्हा अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. लोकल नेत्यांना आणि अनुभवींना राजकारणात महत्व द्यावे, असेही चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

तसेच, जिल्हा बँक निवडणुकी (Bank Election 2021) प्रमाणे चआगामी काळातील निवडणूकांसाठीही असेच धोरण ठेवा. पक्ष तुमच्या पाठीशी आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय चुका झाल्या, कोणाकडून फसवणूक झाली हे लक्षात ठेऊन पुढील निवडणूकांंसाठी तयार रहा, असा सल्लाही यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT