'भास्कर जाधव' नावाचे अस्त्र विरोधकांना पुन्हा घायाळ करणार?

अधिवेशन आणि भास्कर जाधव...
Bhaskar jadhav 1.jpg
Bhaskar jadhav 1.jpgSarkarnama
Published on
Updated on

चिपळूण : महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session)पुढील महिन्यात मुंबईला (Mumbai)होणार आहे. यात बहुप्रतिक्षीत विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'सरकारनामा'सोबत बोलताना सांगितले होते. मात्र आता हे अधिवेशन ३ दिवसांचे प्रस्तावित असल्याने यातअध्यक्षांची निवड लांबणीवर पडणार असल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे भास्कर जाधव नावाचे अस्त्र विरोधकांना घायाळ करणार का? हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.

गत अधिवेशनात भास्कर जाधव तालिका अध्यक्ष असताना असभ्य वर्तन केल्यामुळे विरोधी पक्षातील १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता तालिका अध्यक्ष म्हणून त्यांची पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला असून २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत अधिवेशन प्रस्तावित आहे. त्यानंतरच्या अधिवेशन कार्यक्रमासाठी २४ डिसेंबरला बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यात अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की नाही त्यावर चर्चा होईल करण्यात येणार आहे.

Bhaskar jadhav 1.jpg
शिवसेना नेत्या निर्मला गावित उभारणार स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी १०१ ग्रंथालये!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील (Uddhav Thackeray) शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन नागपूरऐवजी (Nagpur) मुंबईतच होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितले. नुकतेच राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील खांदेपालट होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com