K Chandrashekhar Rao and Shambhuraj Desai  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai on BRS: राज्यात 'बीआरएस'ला थारा मिळणार नाही; जनतेची कास महाराष्ट्राच्या विचारांसोबत; शंभूराज देसाईंनी ठणकावलं

K Chandrashekhar Rao: चंद्रशेखर राव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, ताफ्यात सुमारे 600 गाड्यांचा समावेश

सरकारनामा ब्यूरो

Satara News: तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील 'बीआरएस'च्या सभा गाजल्या. महाराष्ट्रात येवून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 'अबकी बार किसान सरकार' अशी घोषणा दिली. यानंतर आता चंद्रशेखर राव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्यांच्या ताफ्यात सुमारे 600 गाड्यांचा समावेश आहे.

चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पक्षावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार टीका केली आहे. "राज्यात बीआरएस पक्षाला थारा मिळणार नाही. जनतेची कास महाराष्ट्राच्या विचारांसोबत आहे", असं ते म्हणाले.

शंभूराज देसाई म्हणाले, "महाराष्ट्राला राजकीय विचार देणारे अनेक दिग्गज नेते, अनेक पक्ष महाराष्ट्रात झाले आणि आजही आहेत. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. राज्याचा विकास कशात आहे, राज्यातील समान्य मानसाचं हित कशात आहे, लोकाभिमुख कारभार कुठलं सरकार करतंय? हे समजण्या इथपथ सुज्ञ जनता इथं आहे ", असं शंभूराज देसाई म्हणाले.

"शेजारच्या राज्यातील कोणता तरी पक्ष आपल्याकडे येणार आणी इथे काही भासवण्याचा प्रयत्न करणार, याचा काहीही परिणाम राज्यात होणार नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ जरी आलं तर महाराष्ट्र आपल्या राज्याचे विचार सोडून दुसऱ्या राज्यातील विचारांची कास धरेल, असं वाटत नाही", असंही यावेळी ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आज बीआरएसमध्ये प्रवेश करत असल्याच्या प्रश्नावर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं मतही यावेळी शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT