K. Chandrashekhr Rao : गुलाबी वादळ सोलापूरच्या दिशेने रवाना; केसीआर यांचं शक्तीप्रदर्शन, ताफ्यात...

Pink Storm in Maharashtra : भगिरथ भालकेंचा होणार बीआरएस प्रवेश
K Chandrashekhar Rao
K Chandrashekhar RaoSarkarnama
Published on
Updated on

KCR Visit Pandharpur On Ashadhi : तेलंगाणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू झाला आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील बीआरएसच्या सभा गाजल्या. येथून राव यांनी 'अबकी बार किसान सरकार' अशी घोषणा दिली. यानंतर राज्यभर या आशयाचे फलक लागलेले दिसून येत आहेत. त्यातच बीआरएसमध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. आता राव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. (Latest Marathi News)

तेलंगणाचे मुख्यमंत्री राव आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी येत आहेत. ते आपल्या मंत्रिमंडळासह मंगळवारी (ता. २७) विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेणार आहेत. ते रस्तामार्गे येणार आहेत. त्यासाठी ते आज सोमावरी (ता. २६) हैदराबादहून रवाना झाले आहेत. त्यांच्या या ताफ्यात सुमारे ५०० गाड्यांचा समावेश आहे. हा ताफा हैदराबादहून सोलापूरच्या दिशेने रवाना झाला आहे.

K Chandrashekhar Rao
Devendra Fadanvis -OBC Politics: फडणवीसांनी पुन्हा अज्ञान दाखवलं...: शरद पवार स्पष्टचं बोलले

आषाढीनिमित्त तेलंगणचे मंत्रिमंडळ पांडुरंगाचे दर्शन घेणार आहे. त्यापूर्वीच आज हे मंत्रिमंडळ सोलापूर येथे मुक्कामी राहणार आहे. त्यांच्यासाठी सोलापूरमधील हॉटेलमध्ये ३०० रूम्स बुक केल्या आहेत. सोलापूरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी १०० फलक लावल्याचे बीआसएसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी हा ताफा पंढरपूरकडे रवाना होईल. यावेळी बीआरएसच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बीआरएसने राज्यात हातपाय पसरणे सुरू केले आहे. यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्यात पंढरपुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहे. तत्पुर्वी राव यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवून चर्चेसाठी हैदराबादला बोलावून घेतले होते. त्यांच्यात झालेल्या चर्चेंतर भालके यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी भालके यांनी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले.

K Chandrashekhar Rao
Sambhajiraje Chhatrapati News : भावी मुख्यमंत्री उल्लेखावर संभाजीराजे म्हणाले, "माझ्या मनात..."

राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा मोठा समावेश आहे. यामुळे महाविकास आघाडी अलर्ट झाली आहे. आता के. चंद्रशेखर राव थेट पंढरपूर येथे आषाढीनिमित्त दर्शनाला येत आहेत. यावेळी ते काय बोलणार, याकडे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com