Satej Patil, Rajesh Kshirsagar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil Vs Rajesh Kshirsagar : 'सतेज पाटलांचे व्यवसाय दोन नंबरचे, लवकरच भाजपमध्ये?' राजेश क्षीरसागरांचा करारा जवाब

ShivSena : शिंदे गटाचे दहापैकी सात खासदार हे भाजपच्या तिकिटावर लढतील, असा पाटलांचा दावा...

Rahul Gadkar

kolhapur News : शिंदे गटाचे दहापैकी सात खासदार हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे लेखी पत्र दिले असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला होता. त्याला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी करारा जवाब दिला आहे. सतेज पाटील यांचे दोन नंबर व्यवसाय आहेत. त्यातून वाचण्यासाठी त्यांची पळता भुई थोडी झालेली आहे. ते लवकरच भाजपमध्ये जातील, असा हल्लाबोल क्षीरसागर यांनी केला आहे.

आमदार सतेज पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचे (ShivSena) बोट धरून विधानसभेत गेले. आता त्यांनी शिवसेनेला विसरून काँग्रेसला जवळ केले. शिवसेनेचे सात खासदार भाजपच्या (BJP) चिन्हावर लढणार आहेत. असे वक्तव्य करणारे सतेज पाटील ज्योतिषी आहेत का? असा सवालही क्षीरसागर यांनी केला आहे. आम्ही आजही एकसंध आणि भक्कम आहोत. शिवसेनेचे 18 च्यावर खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही क्षीरसागर (Kshirsagar) म्हणाले.

पळता भुई थोडी होईल

सतेज पाटील (Satej Patil) यांचे दोन नंबरचे व्यवसाय आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांना तसं काही करता येणार नाही. देशातून मोदी सरकारची सत्ता जाणार नाही. त्यातून वाचण्यासाठी त्यांच्याही भाजपमध्ये जाण्यासाठी हालचाली सुरू आहेत, असे माझ्या कानावर आल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला आहे.

आपल्यालादेखील काँग्रेसमधून (Congress) कड काढावी लागेल. आपल्यालाही भाजपमध्ये (BJP) जावे लागेल, अशा हेतूने आमदार सतेज पाटील यांनी वक्तव्य केले असावे. ते पुढील काही दिवसांत भाजपमध्ये जातील, असे भाकित क्षीरसागर यांनी वर्तवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT