Sanjay Pawar : ‘मातोश्रीकडून कायमच अपेक्षा करायची नसते’ : जाधवांच्या हकालपट्टीनंतर संजय पवारांच्या मनात काय?  

Shiv Sena (UBT) : हातकणंगले शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची हकालपट्टी...
Uddhav Thackeray, Sanjay Pawar, Murlidhar Jadhav
Uddhav Thackeray, Sanjay Pawar, Murlidhar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : हातकणंगले शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची हकालपट्टी केल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्हाला अपेक्षा होती की मुरलीधर जाधव कायमच पक्षासोबत राहतील, त्यांचे काम चांगले होते. आत्ताच्या राजकीय परिस्थितीत मुरलीधर जाधव पक्षाचे हात बळकट करतील, अशी अपेक्षा होती. मात्र मातोश्रीकडून कायमच अपेक्षा करायची नसते, मातोश्री नेहमीच कार्यकर्त्यांना देत असते, अशा शब्दांत संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर महाविकास आघाडीमध्ये पहिली ठिणगी हातकलंगलेमध्ये पडली होती. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी शेट्टी यांच्यावर आगपाखड करत त्यांना महाविकास आघाडी मध्ये घेण्यास विरोध दर्शवला होता. त्यावरून आता ठाकरे गटात अंतर्गत हालचाली होऊन जाधव यांना जिल्हाप्रमुखपदावरून हटवण्यात आले.

Uddhav Thackeray, Sanjay Pawar, Murlidhar Jadhav
Jitendra Awhad Vs Rohit Pawar : ‘ते अजून लहान, पहिलीच टर्म’! आव्हाडांनी रोहित पवारांनाच सुनावलं

शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारीबदल करण्याची भूमिका घेतली आहे. हातकणंगले लोकसभा (LokSabha) मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघात दोघांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. जाधव यांना गोकुळ दूध संघाचे संचालक आणि आमदारकीचे तिकीट दिले होते. पण त्यांनी निर्णय घेण्याची ही वेळ नव्हती, अशी प्रतिक्रिया संजय पवार (Sanjay Pawar) यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मातोश्रीवर कोण भेटायला गेलं, हे विचारणे हा अधिकार शिवसैनिकांचा आणि जिल्हाप्रमुखांचा नाही. बॉस इज ऑलवेज राईट ही भूमिका जिल्हाप्रमुखांची असायला हवी. पक्षप्रमुख जो निर्णय घेईल, हा महाराष्ट्राच्या हिताचा असेल, असा विश्वास जिल्हाप्रमुखांचा असायला हवा, असे संजय पवार यांनी सांगितले.

Uddhav Thackeray, Sanjay Pawar, Murlidhar Jadhav
Jitendra Awhad on Lord Ram : राम मांसाहारी असल्याबाबत माझ्याकडे पुरावे; आव्हाडांनी दिला रामायणाचा दाखला..

मुरलीधर जाधव यांनी गडबड करायला नको होती. त्यांची आम्हाला गरज होती. त्यांचे मत कोणालाही पटलेलं नाही. त्यामुळे कदाचित मातोश्रीने हा निर्णय घेतला असावा. त्यांनी आजदेखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षासोबत काम करावे. त्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती मुरलीधर जाधव यांना करणार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

(Edited By - Rajanand More)

Uddhav Thackeray, Sanjay Pawar, Murlidhar Jadhav
Jitendra Awhad Controversy : आव्हाड बोले, वाद होणे, हे कसे न घडणे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com