Dhairyasheel Mane  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mane News : धैर्यशील माने यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी? आमदारांची मोट बांधण्याचे आव्हान...

Kolhapur Shiv Sena Politics Mahayuti News : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांची अनुपस्थिती होती.

Rahul Gadkar

Kolhapur News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची सदस्य नोंदणीची मोहीम नुकतीच पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास तीन ते साडेतीन लाख पेक्षा अधिक भाजप सदस्यांची नव्याने नोंदणी झाली आहे. त्यात आता शिवसेनेने देखील उडी घेऊन शिवकार्य सदस्य नोंदणीला प्रारंभ केला आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचे प्रमुख म्हणून खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या संदर्भातील बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. पण पहिल्याच बैठकीत दोन आमदारांची अनुपस्थिती राहिली. मंत्रिपदावरून सुरू झालेली नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.

भाजपकडून सदस्य नोंदणीला प्रारंभ झाल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील राज्यभरात शिवकार्य सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सर्वप्रथम या नोंदणी कार्याला सुरुवात केली. तत्पूर्वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचे प्रमुख म्हणून खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली. या संदर्भातील पहिलीच बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे बैठकीत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र खासदार धैर्यशील माने यांच्याकडून कामानिमित्त आमदार क्षीरसागर हे मुंबईत आहेत, आणि आमदार नरके हे आपल्या कार्यक्रमात निमित्त मतदारसंघात आहेत, असे स्पष्टीकरण दिले.

तत्पुर्वी, शिवसेनेत मंत्रिपदावरून झालेली नाराजी या बैठकीनंतर ही जवळपास परिस्थिती जैसे तेच आहे. धैर्यशील माने यांच्या अध्यक्षस्थानी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वास्तविक पक्षाच्या कार्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे होते. मात्र तसे दिसले नाही. सातत्याने समृद्धीने असो वगैरे समजुतीने असो क्षीरसागर हे अद्याप नाराजच आहेत. असे चित्र समोर येत आहे. शिवाय शहरातील प्रमुख पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित नव्हते.

आरोग्य मंत्रिपद मिळाल्यानंतर आबिटकर यांच्या स्वागतासाठी कोल्हापुरात असूनही स्वागतासाठी लावलेली अनुपस्थिती आजही चर्चेत आहे. त्यामुळे हा डाग पुसून काढण्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आमदार मंत्री आणि खासदारांची मोट एक आहे. हे दाखवण्याची सध्या गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये असलेली एकजूट विरोधकांपेक्षा महायुतीमधील पक्षांनाच अधिक मारक ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT