Shirdi Voter Fraud : शिर्डीत बोगस मतदार नोंदणी, सभापती शिंदेंची गंभीर टिप्पणी; मंत्री विखेंना दिला घरचा आहेर

Ram Shinde bogus voting Shirdi BJP Minister Radhakrishna Vikhe : राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपानंतर विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी शिर्डीतील बोगस मतदार नोंदणीवर प्रतिक्रिया दिली.
Ram Shinde 2
Ram Shinde 2Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Election News : भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना डिवचलं आहे. शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी तिथल्या बोगस मतदान नोंदणीवर टिप्पणी केली. शिर्डीतील बोगस मतदार नोंदणीचा विषय पालकमंत्री विखे आणि संबंधित यंत्रणेने गांभीर्याने घ्यावा, अशी प्रतिक्रिया देत, मंत्री विखेंना सभापती शिंदेंनी घरचा आहेर दिला.

भाजपमध्ये असलेल्या या दोघा दिग्गजांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यातच सभापती शिंदेंनी वरील टिप्पणी करून पुन्हा एकदा मंत्री विखे यांना डिवचलं आहे. तसंच राहुल गांधी यांच्या भूमिकेला देखील सभापती शिंदे फटकारलं आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीवर काँग्रेसच्या (Congress) स्थानिक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील संसदेत हा मुद्दा उचलला होता. त्यामुळे मंत्री विखे यांचा हा मतदारसंघ चर्चेत आला. आता पुन्हा सभापती राम शिंदे यांनी बोगर मतदार मोंदणीवर टिप्पणी केल्याने खळबळ उडाली आहे.

25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

Ram Shinde 2
Neelam Gorhe And Ram Shinde : सभापती राम शिंदेंची 'प्राध्यापक स्टाईल'ने डाॅ. गोऱ्हेंना फटकारले; म्हणाले, 'प्रतिकूल मत, तरीही...'

राम शिंदे म्हणाले, "शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीचा विषय पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि संबंधित यंत्रणेने गांभीर्याने घ्यावा. कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर निर्णय झाला पाहिजे".

Ram Shinde 2
Donald Trump : अमेरिकेला श्रीमंत करणारी ट्रम्प खेळी; 5 दशलक्ष डॉलर्समध्ये विकायला काढलं अमेरिकेचं नागरिकत्व!

'शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार वाढल्याची राहुल गांधींनी केलेली तक्रार म्हणजे, पराभवाचे कारणे देण्यासारखे आहे. या मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी तयार होत असताना, नव्या मतदारांची नोंदणी होताना, त्यावेळी कोणीही हरकत का घेतली नाही? परंतु पराभवानंतर कोणाला तरी दोष देण्याच्या प्रकार आहे', असेही सभापती शिंदे यांनी म्हटले.

आमदार पवारांचे उत्तरच आले नाही

'कर्जत-जामखेड मतदारसंघात माझा पराभव झाल्यानंतर तेथील आमदार रोहित पवार यांनी ईव्हीएम आणि अन्य मुद्द्यांवर मोर्चा काढला होता. त्यावेळी मी त्यांना आव्हान दिले होते की, मी पण आमदार आहे आणि तुम्ही पण आमदार आहात. आपण दोघेही राजीनामा देऊ अन् पुन्हा लढू, असे जाहीर सांगितले होते. परंतु त्यावर त्यांनी उत्तरच दिले नाही आणि नंतर ईव्हीएमविरुद्ध मोर्चासारखे त्यांचे प्रकारही बंद झाले', असा टोला आमदार पवारांना सभापती शिंदे यांनी लगावला.

पवारांची विद्रोही कुस्ती स्पर्धा

अहिल्यानगर शहरात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील निकालावर वाद उफळले होते. यावर सभापती शिंदे म्हणाले, "स्पर्धा अतिशय चांगली झाली. परंतु पवारांनी विद्रोही संमेलनासारखी नवी विद्रोही कुस्ती स्पर्धा जाहीर केली आहे. परंतु ज्यांनी निवडणुकीत नुरा कुस्ती केली. त्यांनी खऱ्या कुस्ती स्पर्धेची भाषा करू".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com