Sanjay Raut, Devendra Fadanvis
Sanjay Raut, Devendra Fadanvis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : दिल्लीश्वरांनी शिंदे-फडणवीसांना गुंगीचे इंजेक्शन दिलंय...संजय राऊत

Umesh Bambare-Patil

सातारा : कालचा महाविकास आघाडीचा मोर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिसला नाही, कारण त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्र व्देषाचा वडस आला आहे. मोर्चा अपयशी ठरल्याचे म्हणणारे शिंदे, फडणवीस हे मधल्या काळात दिल्लीला गेले होते. त्यांना दिल्लीश्वरानी गुंगीचे इंजेक्शन दिलेले दिसतंय. त्यांची गुंगी उतरायला तयार नाही, अशी सडेतोड टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

महाविकास आघाडीने काल काढलेला मोर्चा हा अपयशी व फेल ठरल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी करून तो नॅनो मोर्चा होता अशी टीका केली होती. या टीकेला आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर देत फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. खासदार राऊत म्हणाले, कालचा आमचा मोर्चा अपयशी व फेल आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली असेल तर ते मधल्या काळात दिल्लीला गेले होते. दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचे इंजेक्शन दिलेले दिसतंय. त्यामुळे त्यांची गुंगी उतरायला तयार नाही.

उलट कालच्या मोर्चाचे देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवेत होते. मोर्चाला सामोरे जायला हवे होते. कालचा मोर्चा हा सरकार विरोधात नव्हता तर महाराष्ट्रातील दैवतांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात होता. महाराष्ट्रात आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या शक्ती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर टीका करणाऱ्या आणि सीमा प्रश्नाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याविरोधात होता.

सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधाऱ्यांच्यावर टीका करतात. पण कालच्या मोर्चा ज्यांना दिसला नाही, त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्र व्देषाचा वडस आला आहे, अशी टीका त्यांनी केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्व पक्ष एकवटले होते, त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला होता. पण प्रथमच असे घडतंय की महाराष्ट्र प्रेमी जनता एका बाजूला एकवटली आणि सरकार दुसऱ्या बाजूला झाले आहे. हा मोर्चा नॅनो होता की आणखी काही होता ते देशाने पाहिले आहे. फडणवीस यांना सांगणं आहे की स्वतः ची अवहेलना फार करून घेऊ नका. तुम्हाचे राजकीय भविष्य मोठे असून आपल्याकडे क्षमता आहे. ज्यांनी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली ते राजकारणातून पाचोळ्यासारखे उडून गेले. कालच्या मोर्चाचे तुम्ही कौतुकाने स्वागत करायला हवे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT