Udayanraje Bhosle, Shrirang Barne Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shrirang Barane on oath ceremony : उदयनराजेंच्या मंत्रिपदासाठी खासदार बारणेंनी भाजपवर सोडला ‘बाण’

Umesh Bambare-Patil

Pune Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांना स्थान मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, शपथविधीपूर्वी त्यांचे नाव यादीत नव्हते. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत त्यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारावेळी कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याने त्यांना आता वगळल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्यामुळे सातारकरांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

कोल्हापूर, सातारा व सांगली या तीन जिल्ह्यात भाजपचे उदयनराजे भोसले हे एकमेव खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा होल्ड रहावा, यासाठी उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद मिळणार अशी अपेक्षा होती.

नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची शपथ घेताना त्यांना पाठींबा देण्यासाठी उदयनराजे भोसले नवी दिल्लीत ठाण मांडून होते. त्यानंतर शपथविधीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदनही केले होते. त्यावेळी त्यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचे सांगण्यात येत होते. पण, प्रत्यक्ष शपथविधीच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांच्या समर्थकांत नाराजी पसरली आहे.

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यावेळी उदयनराजेंनाही कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार असल्याचे त्यांच्या समर्थकांतून सांगितले जात आहे. तर काहीजण मंत्रिपदात अडकून उदयनराजेंना पुन्हा मतदारसंघात संपर्क करणे अडचणीचे होणार असल्याने मंत्रिपद नको, असे सांगण्यात आल्याचेही त्यांचे काही समर्थक सांगत आहेत. नेमके काय हे लवकरच समजणार आहे.

या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी यावर भाष्य केले आहे. बारणे यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाने कोणाला मंत्री करावे, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. छत्रपतींच्या गादीला न्याय मिळावा, ही भूमिका राज्यातील जनतेची आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. ते सिनिअर असून छत्रपतींच्या गादीला मान मिळाला असता तर निश्चित महाराष्ट्रातील जनतेला अभिमान वाटला असता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून उदयनराजेंकडे पाहिले जाते. त्यांच्याबाबत भाजपने न्यायिक भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी नमुद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT