Supriya Sule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Supriya Sule: शिवसेना अन् राष्ट्रवादी का फुटली? सुप्रियाताईंनी सांगितली इनसाईड स्टोरी

Why did the Shiv Sena and NCP split: नेता असेल तर कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही, निवडणुकीवेळी माझ्या विरोधात सर्व यंत्रणा होत्या. सरपंच देखील माझ्या विरोधात होते ते घाबरून माझ्यासोबत फोटो देखील काढत नव्हते. तरी देखील मी लढले...

Mangesh Mahale

Maharashtra Politics News 24 Jan 2025: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे आपण पाहिलं, आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली.

दोन्ही पक्ष फुटल्यामुळे राज्यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी अन् एक काँग्रेस असे पाच प्रमुख पक्ष झाले. शिवसेना अन् राष्ट्रवादी कशामुळे फुटली याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्या कोल्हापुरात बोलत होत्या.

शिवसेनेचे नेते, खासदार धैयशील माने यांचे लक्ष वेधत सुप्रियाताईंनी शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस फुटीची इनसाईड स्टोरी सांगितली. धैयशील माने यांना सुप्रियाताई म्हणाल्या, " मी वारंवार तुम्हाला सांगते तुमच्या नेत्यांनी वेळ दिला नाही म्हणून तुमचा पक्ष फुटला. पण आम्ही वेळ जास्त दिला म्हणून आमचा पक्ष फुटला, असे गंमतीने सांगत असते,"

कोल्हापुरात घर घ्यावं आणि कोल्हापुरातूनच रिटायरमेंट घ्यावी, अशी वडिलांची इच्छा आहे, पण आमचे वडील (शरद पवार) राजकीय रिटायरमेंट घेतील अशी लक्षणे दिसत नाहीत. मध्यंतरी ते रिटायरमेंट घेतीली असं वाटत होतं, मात्र त्यांनी रिटायरमेंट घेतली नाही, त्यामुळे अनेकांची अडचण झाली, असे सांगत सुप्रियाताईंना अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

"लोकसभा निवडणुकीत मला लढायचं कळलं. राजकारणात उतर देण्यासाठी तुमच्या जवळ नेता असावा, पण नेत्यासोबत शेवटच्या बाकावरचा कार्यकर्ता देखील असावा. त्याच्याशी तुमची नाळ जोडली गेली पाहिजे. नेता असेल तर कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही, निवडणुकीवेळी माझ्या विरोधात सर्व यंत्रणा होत्या. सरपंच देखील माझ्या विरोधात होते ते घाबरून माझ्यासोबत फोटो देखील काढत नव्हते. तरी देखील मी लढले, त्यावेळी ताराराणीचा विचार माझ्यासोबत होता," असे सुळे म्हणाले.

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन झाले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, कुलगुरू डी टी शिर्के, युवराज आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT