Jyoti Waghmare  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena News: शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाल्या, आदित्य ठाकरे ओसाड नगरीचे राजकुमार

Jyoti Waghmare : ज्योती वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

अरविंद मोटे

Solapur News: कर्नाटकमध्ये नव्या सरकारचा नुकताच शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याच्या निमत्रंणावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेला (शिंदे गट) सोलापूरच्या ज्योती वाघमारे या प्रवक्त्या म्हणून लाभल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आता शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीकेचा सपाटा सुरू केला आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर फर्निचरसाठी कार्यकर्त्यांकडे पैशाची मागणी केल्याचे तसेच त्यांना मारहाण झाल्याचा आरोप त्यांच्याच पक्षातील एका पदाधिकाऱ्याने केला होता. त्यावरून आता ज्योती वाघमारे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "जिकडे राशन तिकडे भाषण", असा टोला त्यांनी सुषमा अंधारे यांना लगावला आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता आली. मात्र, नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात आले नसल्याचा दावा करत ज्योती वाघमारे यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे यांचा उल्लेख उद्‌ध्वस्त ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना ओसाड नगरीचे राजकुमार असा खोचक टोला लगावत "घरात नाही आना, पण मला हवालदार म्हणा" असं म्हणत जोरदार घणाघात केला. दरम्यान, त्यांच्या या टिकेला सोलापुरातील ठाकरे गटाचे नेते काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT