shivsena
shivsena  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्रवेशासाठी शिंदे गटाकडून मला फूस लावली होती; दोन दिवसांत सेनेत परतलेल्या तालुका उपप्रमुखांची कबुली

विश्वभूषण लिमये

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गोटात दोन दिवसांपूर्वीच अक्कलकोटचे शिवसेनेचे (Shivsena) तालुका उपप्रमुख आनंद भुक्कानुरे यांनी प्रवेश केला. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत ते स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परत आले आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी त्यांचे स्वागत केले. शिंदे गटात गेलो आणि आपला भ्रमनिरास झाला, त्यामुळे पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय झाल्याचे भुक्कानुरे यांनी सांगितले. (Shiv Sena taluka deputy chief who went to the Shinde group returned home in two days)

शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद मिळविले आहे. त्यांना शिवसेनेच्या ४० आमदार, तसेच १२ खासदारांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. दुसरीकडे संघटनेच्या पातळीवरही शिंदे गटाकडून जुळवाजुळवी सुरू आहे. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाणाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.

सत्तांतरानंतर सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याचे शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद भुक्कानुरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत तालुका उपप्रमुख आनंद भुक्कानुरे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी हा स्वगृही प्रवेश केला आहे.

दरम्यान, मला शिंदे गटाकडून फूस लावण्यात आली होती. त्याला बळी पडून मी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत माझी मोठी भ्रमनिराशा झाली. महाराष्ट्राचा विकास फक्त उद्धव ठाकरे हेच करू शकतात आणि त्यांना शिवसैनिकांनी साथ देण्याची हीच खरी वेळ आहे.

त्याचबरोबर शिवसेना सोडून गेलेल्या शिवसैनिकांना परत येण्याचं आवाहनही मी यानिमित्ताने करतो, असे सांगून आता मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा खुलासा शिंदे गटातून शिवसेनेत परतलेल्या अक्कलकोटचे माजी उपतालुका प्रमुखाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT