आता उद्धव ठाकरेंचे फडणविसांना थेट उत्तर : मोदी पर्व संपलय, हे लक्षात ठेवा!

BMC election 2022 : मुंबई महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजपची आतापासूनच तयारी..
Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपने मुंबई महापालिका (BMC Election 2022) जिंकण्यासाठी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत नेत्यांनी आज आक्रमक भाषणे केली. मुंबई महापालिकेवर भाजप आणि शिवसेनेचा भगवाच फडकणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला होता.

याला ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव घेऊन उत्तर दिले आहे. ते आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला . त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्रनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले , मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे . भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार , या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला . महाराष्ट्रातील जनता याना मतपेटीतून याचे उत्तर देईलच, असा घणाघात उद्धव यांनी केला आहे.

Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News
आढळराव पाटलांनी बोलावले पण मुख्यमंत्री वळसे पाटलांनाही भेटले...

फडणवीस काय म्हणाले होते? त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे

आपण सारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे आहोत. युद्धाच्या वेळी बिनीचा शिलेदार निवडला जातो. त्यामुळे आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष.

➡️ मुंबईत भाजपा आणि शिवसेनेचा भगवा फडकेल. पण शिवसेना कोणती तर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करणारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची. आपला स्ट्राईक रेट दुपटीपेक्षा अधिक.गेल्या निवडणुकीत 35 वरून आपण 83 वर गेलो.आता तोही विक्रम मोडायचा आहे. ट्वेंटी-ट्वेंटी खेळून मुंबई विकास लीग आपल्याला जिंकायची आहे.

धारावी पुनर्विकास प्रश्न मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार येत्या 3 महिन्यात सोडवेल, चिंता करण्याची गरज नाही. आपण मराठीच्या नावावर मत मागणारे नाही तर मराठीची सेवा करणारे लोक आहोत. भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबई महापालिकेला बाहेर काढावेच लागेल.

Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News
थकीत पगार मागणाऱ्या चालकास भाजप नेत्याने खासदारासमोरच धमकावले

सामान्य मुंबईकरांना त्यांना त्यांचा हक्क देणारे प्रशासन मुंबई महापालिकेत द्यावे लागेल. जशी-जशी निवडणूक जवळ येईल, तसे भावनिक आवाहन वेग घेईल. मुंबई महाराष्ट्रातून तोडण्याचा डाव, अशी विधाने येतील. मुंबई तोडण्याची कुणाची हिंमत नाही. माझी त्यांना विनंती आहे की किमान डायलॉग तरी बदला.दुसरं वाक्य : महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही.

मी पण सांगतो महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जितके वेळा दिल्लीला जावे लागेल, मी आणि मुख्यमंत्री आम्ही जाऊ. तुमच्यासारखे सोनिया गांधींसमोर समोर झुकणार नाही. मुंबईकरांना आता न्यायाधीश व्हावे लागेल आणि त्यांनाच मुंबईचे भाग्यविधाते व्हावे लागेल. जगाला हेवा वाटावा, असे मा. नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व आपल्याकडे आहे. मी त्यात काय योगदान देऊ शकतो, याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com