Shivsena UBT Oppose Shaktipeeth Highway Project  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena UBT Politics : एका किलोमीटरसाठी 100 कोटींचा खर्च, रस्ता सोन्याचा बनावताय का? ठाकरेंच्या आमदार-खासदाराने सुनावले

Shivsena UBT Oppose Shaktipeeth Highway Project : आमदार सुनील प्रभू म्हणाले, मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद झाले आहे. सरकार ही योजनाच गुंडाळणार आहे.

Rahul Gadkar

Shivsena UBT Politics : भाजपच्या ठेकेदार आणि दलालांसाठी शक्तिपीठ महामार्ग करून शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरवला जात आहे. एक किलोमीटरच्या रस्त्यामागे 100 कोटी खर्च करून सोन्याचे रस्ते बनवणार आहेत का? कोल्हापूर शहरातील रस्त्याची चाळण झाली. 100 कोटी कोणाच्या घशात घातले? असा संतप्त सवाल आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यातून माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार सुनील प्रभू यांनी केला.

जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग पंचगंगा नदीत विसर्जित होत नाही, तोपर्यंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसू नये, असे आवाहन या मेळाव्यातून केले. राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सत्तेवर आल्यानंतर महायुती सरकारला या आश्वासनाचा विसर पड़ला आहे. लाडक्या बहिणींना अजून दरमहा 2100 दिले नाहीत. पण, ठेकेदारांच्या भल्यासाठी शक्तिपीठ केले जाणार असल्याची टीका राऊत यांनी केली.

आमदार सुनील प्रभू म्हणाले, मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद झाले आहे. सरकार ही योजनाच गुंडाळणार आहे. शहरात रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. 100 कोटी कोणाच्या घशात घातले असा सवाल केला.

संजय पवार यांची नाराजी कायम

रविकिरण इंगवले यांना जिल्हाप्रमुख केल्यानंतर उपनेते संजय पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात संजय पवार यांचा कोठेही उल्लेख नसल्याने ते या मेळाव्याला येतील का नाही? याची शक्यता कमीच होती. अखेर त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवून आपली नाराजी कायम असल्याचे दाखवून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT