Sanjay Raut Honey Trap Controversy : हनी ट्रॅपमध्ये चार मंत्र्यांमध्ये भाजपचे दोन, 16 ते 17 आमदार, चार खासदार यातून दिल्लीच्या गळाला; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Sanjay Raut on Honey Trap: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रेस घेत राज्यातील हनी ट्रॅपवर मोठा गौप्यस्फोट केला.
Honey Trap Scandal
Honey Trap ScandalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Honey trap political row : राज्यात हनी ट्रॅपवरून घमासान सुरू असतानाच, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत.

"हनी ट्रॅपचे जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली इथून सूत्र हालली आहेत. यात चार मंत्री असून, दोन भाजपचे मंत्री आहेत. आमचे 16 ते 17 आमदार, चार खासदार यातून भाजपने गळाले लावले. मला आणि एकनाथ खडसे यांनी सर्व माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना देखील सर्व माहिती आहे", असा दावा करत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "हनी ट्रॅपमध्ये आमचे अडकलेले चार खासदारांचे नावे वेळ आल्यावर लवकरच सांगेल. पण आम्ही प्रफुल्ल लोढाचा जो फोटो दिला आहे. त्यावर हनी ट्रॅपच्या केसस दाखल आहे. याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली इथून हालली आहे. या हनी ट्रॅपमध्ये चार मंत्री आहेतच". देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. त्यामुळे पोलिस पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी जंग-जंग पछडताय. आज पाच छापे टाकले आहेत. काल दिवसभर पोलिस तपासावर होते. लोढाकडील पेन ड्राईव्ह आणि सीडी कुठं लपवल्या आहेत. हनी ट्रॅपमध्ये चार पैकी दोन मंत्री भाजपचे आहे, असा दावा राऊत यांनी म्हटले.

'प्रफुल्ल लोढा भाजपच्यावतीनं (BJP) हनी ट्रॅपमध्ये लोकांना पकडत होता. त्यामुळे लोढा आमचे नाहीत, असे कितीही म्हटले, तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर त्याचे फोटो आहेत. संजय राऊत यांनी लोढ्याचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्काराचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. लोढा भाजपचा हस्तक आहे. त्याच्या माध्यमातूनत भाजपने स्वतःच्या लोकांबरोबरच विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात ट्रॅप लावले गेले. पण आता स्वतःवर उलटल्याने आता धावाधाव सुरू आहे', असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Honey Trap Scandal
Gujarati language in Mumbai : गुजरात भाजप आमदारानं मुंबईत येत 'मनसे'ला डिवचलं; संपर्क कार्यालयाच्या 'गुजराती भाषे'वर ठाम

'भाजपच्या वाॅशिंग मशीनमध्ये काही डाग धुतले जात नाही. त्यातला हा एक डाग आहे. आज सकाळपासून लोढाच्या अनेक ठिकाणांवर पोलिस छापा घालत आहे. पोलिसांना चार पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत. दोन सीडी आहे. हा एक ऐवज आहे. त्यात काय आहे हे देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि काही मंत्र्यांना माहिती आहे', असा दावा संजय राऊत यांनी केला.

Honey Trap Scandal
Ajit Pawar News : रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अजितदादांनी दिला सल्ला; म्हणाले, भान ठेवूनच वागलं पाहिजे...

महाराष्ट्राची बदनामी होत आहे

'अशा प्रकारांमध्ये तक्रारदार नसतो. आमचे चार तरुण खासदार याच प्रकरणामुळे पळून गेले. तपास यंत्रणाचा भाग वेगळा आहे. 'आयएएस', 'आयपीएस' अधिकाऱ्यांचा समावेश, यावर बोलणं उचित नाही. महाराष्ट्राची बदनामी होते. पण काय विकृतीचे लोक मंत्रालयात बसले आहेत, हे कळलं पाहिजे. नैतिकतेचे गोष्टी करणाऱ्यांचे नाकच कापले आहे', असा घणाघात संजय राऊत यांनी म्हटले.

फडणवीस, महाजन अन् लोढा यांचे फोटो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅप वैगेरे काहीच नाही, असा दावा केला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'लोढा त्यांच्याच बाजूला बसला होता. देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात, हे सर्वांना माहिती आहे. हनी ट्रॅपचे आजूबाजूलाच बसले आहेत. टोळी बाजूला आहे. पण हनी ट्रॅपचा सूत्रधार त्यांच्या बाजूला आहे'

राऊत अन् खडसेंना सर्व माहिती

हनी ट्रॅपचे सीडी किंवा फोटो तु्म्ही पाहिला आहे का, यावर संजय राऊत यांनी, 'मी आणि एकनाथ खडसे यांनी सर्व पाहिलं आहे. हनी ट्रॅपची सुरवात दिल्लीतून झाली. महाविकास आघाडीचे सरकार होते. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी निसटता स्पर्श करत, हनी ट्रॅपमुळे सरकार पडल्याचं सांगितलं. पण हे सरकार पाडलं', असा दावा संजय राऊत यांनी केला.

16 ते 17 आमदार, चार खासदार...

'16 ते 17 आमदार, चार खासदार यातून भाजपने गळाले लावले. उद्याचा सामनाचा अग्रलेख वाचा. वेष पालटून जात होते, ते सीडी दाखवायला जात होते. हुडी घालून मरीन लाईनच्या पुलाखाली भेट होते, काळोखात भेटत होते. तिथं सीडी दाखवली जात होती. यातून काहींनी दरदरून घाम फुटला अन् चौथ्याच दिवशी सुरतला रवाना झाले. यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाही. भाजपचा, एकनाथ शिंदे यांचा हिंदुत्वाचा संबंध नाही. फुले-आंबेडकर-शाहू यांचा विचार, यांचा काही संबंध नाही. यांची पळून जाण्याची कारण फार वेगळी आहे', असेही संजय राऊत यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com