kailas patil-omraje nimbalkar-ranajagjitsinha patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rana Patil Politic's : राणा पाटलांचा कैलास पाटील, ओमराजेंना दे धक्का : ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 नगरसेवक भाजपत प्रवेश करणार

Shivsena UBT 10 Corporator Join BJP : कळंब नगरपालिकेतील शिवसेना उबाठाचे दहा नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रवेशामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकरांना धक्का दिल्याची चर्चा आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 20 August : धाराशिव जिल्ह्याच्या कळंब नगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 नगरसेवक आज (२० ऑगस्ट) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. या निमित्ताने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शिवसेना उबाठाचे आमदार कैलास पाटील आणि शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे.

भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक आज सोलापूरमध्ये होत आहे. त्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील व इतर प्रमुख नेते उपस्थित आहेत. त्या बैठकीच्या निमित्ताने सोलापुरात आलेले आमदार राणा पाटील यांनी कळंब नगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत माहिती दिली.

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना उबाठा विशेषतः ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत गेलेले ओमराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामागे भाजप नेते राणा जगजीतसिंह पाटील यांचा मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे.

आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, सोलापुरात आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होत आहे. कळंबमधील हे सर्व १० नगरसेवक आमचे जुनेच सहकारी आहेत, कळंबचा विकास करण्यासाठी ते भाजपत प्रवेश करत आहेत.

नगरसेवकांचा भाजप प्रवेश हा कोणालाही धक्का नसून कळंब आणि धाराशिव जिल्ह्याला होणारा फायदा आहे. जसे ओमराजे आणि कैलास पाटील हे माझे जुने सहकारी आहेत. तसेच, आता प्रवेश करणारे नगरसेवकही माझे जुनेच सहकारी आहेत, असा दावाही माजी मंत्री राणा पाटील यांनी केला.

ते म्हणाले, धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही काम करतोय. याला 'ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर' असं म्हणण्याचे काही कारण नाही. दरम्यान, कळंब नगरपालिकेची सदस्यसंख्या 20 असून त्या पैकी भाजपचे 6, शिंदेसेनेचे 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 या पैकी 8 जण आज प्रवेश करत आहेत. स्वीकृत नगरसेवक तथा गटनेते मुंदडा असे एकूण 9 जण आणि काँग्रेसचा एक असे दहाजण प्रवेश करत आहेत.

भाजपमध्ये गटतट असा प्रश्न नसतो. बसवराज पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याकडे लातूरची मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या कार्यक्रमाचे मला आमंत्रण मिळत नाही, असे नाही. मात्र, मी त्यावेळी उपलब्ध नसेल म्हणून मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो नसेल. ते बोलावत नाहीत किंवा मी बोलावत नाही, असे काही नाही, असे स्पष्टीकरणही राणा पाटील यांनी दिले.

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणतात त्याप्रमाणे ऑपरेशन टायगर ही निरंतरी चालणारी प्रक्रिया आहे, तसेच आमचंही ऑपरेशन लोटस ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे यापुढेही पक्ष प्रवेशाची प्रक्रिया चालू राहणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT