Caste discrimination : धक्कादायक : माजी केंद्रीय मंत्र्यांच्या आमदार पत्नीशी जातीवरून भेदभाव; अगरबत्तीही पेटवू दिली नाही...

BJP MLA Jai Devi Kaushal, Lucknow temple controversy, Kakori Sheetla Temple : काकोरीतील शीतला मंदिरातच भाजप आमदार जय देवी यांना जातीच्या कारणावरून पूजेला बसू न दिल्याचा आरोप; पासी समाजातील असल्याने केला भेदभाव.
BJP legal notice to Omar Abdullah
BJP legal notice to Omar AbdullahSarkarnama
Published on
Updated on

BJP MLA news : देशात जात, लिंग, भाषेवरून भेदभाव होऊ नये, यासाठी कायदे करण्यात आले आहेत. सर्वांना समान वागणूक मिळावी, यासाठी सरकारही नेहमी आग्रही असते. पण आजही देशातील अनेक भागांत जात, महिला-पुरूष असा भेदभाव केला जात असल्याचे वास्तव आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे याचा फटका सत्ताधारी भाजपच्या महिला आमदाराच बसला आहे.

उत्तर प्रदेशातील काकोरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार जय देवी कौशल यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. आपण पासी समाजाचे असल्याने आपल्याशी भेदभाव करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकार लखनऊमधील काकोरी शीतला मंदिरात घडला आहे. आमदार जय देवी यांनी मंदिर प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

नियोजित कार्यक्रमानुसार जय देवी या मंदिरात आल्या होत्या. मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी पर्यटन विभागाने ७६ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. पण आमदार असूनही या कार्यक्रमात आपल्याला सहभागी होऊ दिले नाही. आपल्या प्रयत्नातूनच हा निधी मिळाल्याचा दावा भाजप आमदार जय देवी यांनी केला आहे.

BJP legal notice to Omar Abdullah
Congress news : काँग्रेसमधील बड्या नेत्याच्या लेकीचे पक्षाच्याच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; आईच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच उडवून दिली खळबळ

कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याशी भेदभाव करण्यात आला. पूजा सुरू असताना आपल्याला बसूही दिले नाही. अगरबत्तीही पेटवू दिली नाही. मी पासी समाजातील असल्याने भेदभाव करण्यात आला. पूजेवेळी आपला अपमान करण्यात आला, असा आरोपी त्यांनी केला आहे. संपूर्ण कार्यक्रमात आपल्याला सहभागी होऊ दिले नाही. याबाबत पक्षातील नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

BJP legal notice to Omar Abdullah
Shiv Sena symbol case : एकनाथ शिंदेंचे 39 आमदार अपात्र ठरले असते अन् आयोगाचा फॉर्म्यूला तोच असता तर..! ठाकरेंचे 34 शिलेदार ठरले असते वरचढ

जयदेवी यांचे पती आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. विद्यमान आमदाराशी अशाप्रकारे भेदभाव केला जात असेल तर ते निषेधार्ह आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मी याबाबत बोलणार आहे. तसेच हे प्रकरण मुख्यमंत्र्‍यांपर्यंत घेऊन जाणार असल्याचेही कौशल किशोर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com