दिलीप सातपुते
दिलीप सातपुते सरकारनामा
पश्चिम महाराष्ट्र

बेकायदा बायोडिझेल विक्रीत शिवसेनेचा शहर प्रमुखच मास्टरमाईंड

Amit Awari

अहमदनगर : केंद्र सरकारकडून देशातील प्रदुषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. यात बायोडिझेलचा ही वापर करण्यावर विचार सुरू आहे. मात्र याच बायोडिझेलचा बेकायदा वापर अहमदनगर जिल्ह्यात वाढला आहे. या बायोडिझेल प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांना शिवसेनेचा अहमदनगर शहर प्रमुखच मास्टरमाईंड असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. Shiv Sena's city chief mastermind in illegal sale of biodiesel

अहमदनगर जिल्ह्यात बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पदाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल आहे. मागील महिनाभरापासून जिल्हाभरात बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पुरवठा विभागाने दोन-तीन कारवाई केल्यानंतर पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच केडगाव बाह्यवळण चौकातील एका हॉटेलवर छापा टाकला होता. यात बेकायदेशीर बायोडिझेल विक्री करणारे मोठे रॅकेट समोर आले होते.

या प्रकरणी पोलिसांनी सुरवातीला सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. 52 लाखांचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आणखी चार आरोपींना अटक केली. आत्तापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मागील चार-पाच दिवसांपासून पोलिसांनी बायोडिझेलच्या तपासाला चांगलीच गती दिली आहे. आणखी 12 जणांची नावे तपासात निष्पन्न केली आहेत. त्यामुळे आता पोलिसांना 22 आरोपी असल्याचे आढळून आले आहे. त्यात दिलीप सातपुते याच्याविरोधात पुरावे आढळून आले आहेत. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून दिलीप सातपुते पसार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही त्याला पक्षातून हकालपट्टी करण्याची तयारी केली असल्याचे समजते.

गुरुवारी (ता. 18) रात्री कोतवाली पोलिसांनी दिलीप सातपुते व प्रवीण मोरे या दोघांनाही आरोपी केले आहे. पोलिसांनी सातपुते याच्या घरी जाऊन शोध घेतल्याचीही माहिती आहे. बेकायदेशीर बायोडिझेल विक्रीची सुमारे 30 ते 40 कोटींची उलाढाल जिल्ह्यात झाल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सातपुते याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT