Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News Updates Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवाजी कर्डिले म्हणाले, राम शिंदेंना विधान परिषदेचे आमदार करा...

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांची भाजप कोअर कमिटीत निवड झाली.

अमित आवारी

अहमदनगर - भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांची भाजप कोअर कमिटीत निवड झाली. या निमित्त त्यांचा पेमराज सारडा महाविद्यालयात भाजपतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांनी त्यांच्या भाषणातून एक महत्त्वाची मागणी केली. ( Shivaji Kardile said, make Ram Shinde MLA of Legislative Council ... )

या कार्यक्रमाला राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शहर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदींसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. या प्रसंगी शिवाजी कर्डिले म्हणाले की, राम शिंदे यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात विकासाची अनेक कामे केली आहेत म्हणून पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत भाजप कोअर कमिटीत घेतले आहे. त्याचे चिज करण्याच जबाबदारी त्यांच्यावर आहे. (Shivaji Kardile Latest News Updates)

कर्डिले पुढे म्हणाले की, नगर जिल्ह्यातील भाजपला ताकद मिळायची असेल तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करेल की, अहमदनगर जिल्ह्यात सत्तेत भाजपला कोणी वाली राहिलेला नाही. जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना आमदार करण्यात यावे. शिंदे यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील भाजपला ताकद मिळेल. त्यासाठीचा प्रस्ताव मी मांडतो. सर्वांनी या प्रस्तावाला मंजुरी द्यावी. तरच जिल्ह्यात आपला पक्ष सरस राहील. जिल्ह्यात टिकेल.

मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाही. मी पाच वेळा आमदार झालो. मंत्री झालो. म्हणून राम शिंदे यांना संधी मिळावी. त्यासाठी मीच ठराव मांडतो. असे म्हणत कर्डिले यांनी ठराव मांडला. या ठरावाला भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT