Satara collector Ruchesh Jayvanshi, MLA Shivendraraje Bhosale
Satara collector Ruchesh Jayvanshi, MLA Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : शिवेंद्रसिंहराजे संतप्त : कास परिसरातील बांधकामे पाडल्यास आंदोलन करणार...

Umesh Bambare-Patil

Satara News : मुख्यमंत्र्यांनी Eknath Shinde कास परिसरातील बांधकामाबाबत स्पष्ट सूचना देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आम्ही त्यांना विचारणा करु. पण, तरीही प्रशासनाने बांधकामे पाडण्याचा प्रयत्न केल्यास आमचा त्याला विरोध असेल. तसेच या विरोधात आंदोलनाची भूमिका घेऊ. त्यामुळे कास परिसरातील कोणतीही बांधकामे काढली जाणार नाहीत, असे स्पष्ट मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काल यवतेश्वर कास रस्त्यावरील अनाधिकृत बांधकामे पाडण्याबाबतचे आदेश दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका पत्रकारांनी जाणून घेतली. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कास परिसरातील व्यवसायिकांची मुंबईत बैठक झाली होती. त्यामध्ये या बांधकामाबाबत चर्चा झाली होती.

त्यामुळे तेथील कोणतीही बांधकामे काढली जाणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही अशा पध्दतीने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश कसे दिले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करु. मुळात कास परिसरातील बांधकामांबाबत मुद्दाम गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

एकतर ही अतिक्रमणे नाहीत. दुसरी बाब म्हणजे मुंबईतील बैठकीत एमएसआरडीसीचे अधिकारी ही उपस्थित होते. त्यांनी ग्रीन हॉटेल या संकल्पनेखाली या व्यावसायिकांना परवानगी आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ०.५ एफएसआयपर्यंत माझ्या अधिकाराखाली या बांधकामांना कायम करुन देऊ शकतो.

या परिसरात १५५ बांधकामे असून ०.५ खाली सगळी बांधकामे बसतात. तरही जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश कसे दिले. याची माहिती घेऊ. काही झाले तर बांधकामे पाडण्यास आमचा विरोध आहे. तरीही प्रशासनाने बांधकामे पाडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT