Mumbai Mantralaya Rats News: राज्याच्या राजकारणात भूंकप होणार असल्याचा बातम्यांचा जसा सुळसुळाट झाला आहे. तसाच मंत्रालयात सध्या उंदिरांचा सुळसुळाट झाला आहे. समाजमाध्यमांमध्ये अफवांचे पीक आले असतानाच मंत्रालय पोखरणारे भष्ट्र उंदीर पुन्हा चर्चेत आले आहे.
मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर उंदरांचा संचार आहे. मंत्रालयातील फायलींचा जलद गतीने हे उंदीर फायलींचा निपटारा करीत आहेत. हे फायली कुडतळणारे उंदीर महाविकास आघाडीतील आहे की शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील, यांचा शोध घेणं मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसमोर एक मोठे आव्हान आहे.
मंत्रालयातील तळमजल्यावरील पत्रकार कक्षापासून सहाव्या मजल्यावर उंदरांचा मुक्तपणे संचार असतो. दुसऱ्या मजल्यावर या उंदिरांनी उच्छाद मांडला होता. त्यांनी फायली, झेरॉक्स पेपर आणि कार्यालयीन पेपर कुरतडून टाकले होते. मंत्रालयाच्या इमारतीची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होते, पण नेमक्या याच खात्यात उंदिरांनी उच्छाद मांडला होता.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयामध्ये उंदीर मारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. खडसेंनी उंदीर मारण्याचा कंत्राट व मारलेल्या हिशेब मांडला होता. त्यानंतर हे कंत्राट बंद करण्यात आले.
आता उंदीर पकडण्यासाठी पिंजरे लावले जातात. त्यानंतर पकडलेले उंदीर मंत्रालयाच्या बाहेर नेऊन सोडतात. काही दिवसांनीत तेच उंदीर पुन्हा मंत्रालयात येतात, असे सांगण्यात येते.
मंत्रालयामध्ये उंदीर मारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी उंदीर मारण्यासाठी दिलेले कंत्राट व मारलेल्या उंदरांचा हिशोब मांडला होता.
या प्रकरणानंतर मंत्रालयात उंदीर मारण्याचे कंत्राट देण्याचे बंद केले. आता फक्त पिंजरा लावला जातो आणि पिंजऱयात सापडलेले उंदीर मंत्रालयाच्या बाहेर नेऊन सोडतात, पण हेच उंदीर पुन्हा मंत्रालयात येत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काल (मंगळवारी) दुसऱ्या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी एका फटक्यात चार उंदीर मारले. मंत्रालयातील हे 'मिशन रॅट' पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. दिवसभर या उंदीर पुराणाची चर्चा मंत्रालयात होता.
मंत्रालयाच्या इमारतीची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होते, पण याच खात्यात उंदिरांनी उच्छाद मांडला आहे. उंदराचा निपटाला करणाऱ्या मांजरी कुठे गायब झाल्या, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.