सातारा : बगलबच्च्यांची घरं चालवण्यासाठी शासनाचा पैसा खर्च करून 'कास महोत्सव' आयोजित करणे योग्य नाही, असे मत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान या महोत्सवाबाबत शासनाकडे तक्रार करणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले आहे.
आज (शुक्रवार) पासून तीन दिवस सातारा जिल्हाधिकारी, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या वतीने कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावरुन काही सामाजिक कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनी आक्षेप नोंदविले आहेत. या ठिकाणी वृक्ष तोड देखील झाली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींत तीव्र नाराजी पसरली आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कास महोत्सवाचं आयोजन प्रशासनानं स्वत: करुन त्याच्या निधीचा योग्य वापर केला पाहिजे हे पहावे. या महोत्सवाच्या नावाखाली काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यावर वन विभागाने संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा राजेंनी व्यक्त केली.
कुठल्यातरी लोकप्रतिनिधींच्या बगलबच्च्याची घरे चालवण्यासाठी शासनाचा पैसा खर्च करणे हे योग्य नाही, असे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता म्हटलं आहे. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी स्वत: याबाबतची तक्रार शासनाकडं करणार आहे.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, याचा खर्च शासन करत आहे का खासगी डान्स क्लास चालवणाऱ्याच्या आग्रहाखातर आणि लोकप्रतिनिधीच्या आग्रहाखातर होत आहे ? अशी शंका उपस्थित होत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा धंदा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.