Satara : लोकसभेप्रमाणे सातारा पालिकेतही उदयनराजेंना नारळ द्या... शिवेंद्रसिंहराजे

ग्रेडसेपरेटरच्या grade separetor कामावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale व खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्यात कलगीतूरा रंगला आहे. आज शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर पुन्हा टीकेची झोड उठवली.
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : उच्चशिक्षित होता तर तुम्ही काय दिवे लावलेत ते सातारकरांना दाखवा, असा टोमणा मारून स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचे काम त्यांनी आता थांबवावे. सातारकरांनी त्यांना लोकसभेला नारळ दिलेलाच आहे. आता नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांच्या हाती नारळ देण्याची वेळ आली आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंवर केली.

ग्रेडसेपरेटरच्या कामावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात कलगीतूरा रंगला आहे. आज शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर पुन्हा टीकेची झोड उठवली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ग्रेडसेपरेटरबाबत सातारकरांच्या जे मनात आहे, तेच मी बोलून दाखवले होते. पोवईनाक्यावरील वाहतूक कोंडी व अपघात कमी होईल, अशी अपेक्षा होती. ती पूर्ण झालेली नाही.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Satara : ग्रेडसेपरेटर निरूपयोगी म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची किव वाटते... खासदार उदयनराजे

हा ग्रेडसेपरेटर साताकरांच्या उपयोगी पडलेला नाही. केवळ पैसा वाया गेला आहे. फार कमी लोक यातून प्रवास करत आहेत. उदयनराजेंकडून केवळ स्वतःच स्वतःची पाठ थोपटण्याचे काम सध्या सुरू आहे. सातारा पालिकेतील भ्रष्टाचार सातारकरांनी पाच वर्षे उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. मीच आरोप केलेत असे नाही. कोविडमध्ये नगरपालिकेला साधे एक कोविड सेंटर उभारता आले नाही. केवळ टेंडरबाजी केली जात आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी 'ग्रेडसेपरेटर' सातारकरांच्या माथी मारला... शिवेंद्रसिंहराजे

भुयारी गटार योजना, घरकुल योजना अशा अनेक योजना अपूर्ण आहेत. मी कधीही ग्रेडसेपरेटरच्या कामाचे श्रेय घ्यायला आलेलो नाही. कारण तो लोकांच्या उपयोगी पडेल अशी कामेच झाली नाहीत. कास धरण उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले. त्यांना पाईपलाईनचे काम वेळेत करता आलेले नाही. सगळा बोगस कारभार आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
सातारा पालिकेत ५० जागा जिंकणार; मिशीला पीळ, ताव मारून होत नसतं... उदयनराजे

उदयनराजे म्हणतात की आम्ही टीका करायची नाही, असे ठरवले होते. पण, त्यांचे बोलण आणि वागणं म्हणजे 'मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली,' असे आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरेच असा त्यांचा कारभार आहे. त्यांनी पालिकेत पाच वर्षे वाया घालवली. आता सांगायला काहीही नाही.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
कमिशनबाजीमुळे उदयनराजेंच्या आघाडीचा शंभर टक्के कडेलोट होणार... शिवेंद्रसिंहराजे

परत पालिकेची सत्ता येण्याची वाट धूरसर झाल्याचे चित्र त्यांना माहिती झाले आहे. शिक्षणावरून उदयनराजेंनी केलेल्या टीकेवर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, तुम्ही उच्च शिक्षित होता तर तुम्ही काय दिवे लावलेत ते सातारकरांना दाखवा. स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारणे त्यांनी थांबवावे. सातारकरांनी यांच्या हातात नारळ द्यावा. कारण लोकसभेला नारळ दिलेलाच आहे. आता नगरपालिकेतही देण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com