Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale design@apglobale.com
पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, उदयनराजेंना माझं बोलणं झोंबलं....

कारखान्यावरील टीका शिवेंद्रसिंहराजेंनी Shivendraraje Bhosale अंगावर ओढून घेतली होती, अशी टीका खासदार MP उदयनराजेंनी Udayanraje केली होती.

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : त्यांना माझे बोलणं झोंबलं असेल त्यामुळे त्यांनी पत्रक काढून सपसेल माघार घेतली आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला आहे. कारखान्यावरील टीका शिवेंद्रसिंहराजेंनी अंगावर ओढून घेतली या उदयनराजेंच्या वक्तव्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी हा टोला लगावला आहे.

'वॉटर स्पोर्ट' प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याविषयीची माहिती देण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कारखान्यावरील टीका शिवेंद्रसिंहराजेंनी अंगावर ओढून घेतली या उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''त्यांना माझे बोलणं झोंबलं असेल त्यामुळे त्यांनी पत्रक काढून सपसेल माघार घेतली आहे.''

दोन्ही राजांतील कलगीतूऱ्याची सातारकरांतून चेष्टेचा विषय होऊ लागला आहे, या विषयी विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''ते बोलले म्हणून मी बोलतो. त्यांनी बोलताना विचार करून बोलावे. मी स्वःत त्यांच्यावर टीका करायला जात नाही.'' शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''शिवसागर जलाशयात होणाऱ्या वॉटर स्पोर्ट प्रकल्पासाठी ५० कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे योगदान आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून सातारा जावळीतील पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.''

कोकणाप्रमाणे या प्रकल्पात स्कुबा डायव्हिंग, स्पीड बोटची सुविधा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. तसेच सातारा शहरातील प्रांताधिकारी, तहसिल कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय प्रतापसिंह शेती शाळेच्या जागेत होणार आहे. त्यासाठी २७ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

या जागेत प्रशस्त अशी शासकिय इमारत होणार आहे. त्यामुळे नागरीकांची सोय होणार असून अधिकाऱ्यांनाही नीट काम करता येणार आहे. तसेच पालिकेच्या इमारतीसाठीही दहा कोटींचा निधी मिळाला आहे. किल्ल्यांच्या दुरूस्तीसाठी आणखी निधी उपलब्ध होणार असून रस्त्यांच्या कामांसाठी व किल्ल्यांच्या कामांसाठी आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे, असे त्यांनी नमुद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT