Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale

 

Pramod Ingale, satara

पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, सातारा पालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार

जिल्हा बँकेत Satara Dcc दोन्ही राजे बिनविरोध झाले असल्याने सातारा पालिकेतही Satara Palika दोघे एकत्र लढतील, अशी आशा सातारकरांना Satara Peoples आहे.

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षियांनी तयारी सुरू केली आहे. त्यांना आम्ही बंधन घालू शकत नाही. पण, नगर विकास आघाडी पालिकेची निवडणूक स्वःतच्या ताकतीवर व स्वबळावर लढणार असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सातारा पालिकेत दोन्ही राजांच्या आघाड्या आमने-सामने भिडणार असल्याचे चित्र आहे.

सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र येतील, अशी सातारा शहरात चर्चा आहे. याविषयी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे मत पत्रकारांनी जाणून घेतले. त्यावेळी त्यांनी मात्र, सातारा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा बँकेत दोन्ही राजे बिनविरोध झाले असल्याने सातारा पालिकेतही दोघे एकत्र लढतील, अशी आशा सातारकरांना आहे. पण, शिवेंद्रसिंहराजेंनी मात्र, या नकार दिला आहे. ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही बिनविरोध झालो असलो तरी, माझ्या विरोधात कोणीही उमेदवार दिला असता तरी माझी निवडणूक लढण्याची तयारी होती. मी कोणाचीही विनंती करायला तसेच कोणाच्या पायऱ्या झिजवायला गेलो नव्हतो. उदयनराजेंचा बिनविरोधचा निर्णय विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतला आहे. या निर्णयाशी माझा काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पालिकेच्या निवडणुकीत आम्ही आमच्या ताकतीवर व स्वबळावर लढणार आहोत. राष्ट्रवादीनेही पॅनेलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याविषयी विचारले असता ते म्हणाले, असु देत कोणीही असुदेत शिवसेना, भाजप, आरपीआय असु देत. त्यांना आपण बंधन घालू शकत नाहीत. ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी ती लढवावी. आम्ही आमच्यापरिने तयार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT