शिवेंद्रसिंहराजे भडकले : गरम शशिकांत शिंदेंना थंड करून घरी बसवू

पक्ष वाढवण्यासाठी जावलीच Jawali का, असा प्रश्न करून माण Maan, खटाव Khatav किंवा पाटणमध्ये Patan पक्ष वाढविण्यास जावे, त्यांचे जावलीत का लक्ष आहे हे आमच्या लक्षात आले असून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात... हे न समजण्याइतका मी नाही, असे शिवेंद्रसिंहराजेंनी shivendraraj Bhosale स्पष्ट केले.
Shivendraraje Bhosale, Shashikant shinde
Shivendraraje Bhosale, Shashikant shindeSarkarnama
Published on
Updated on

सातारा : भविष्यातील सातारा, जावळी तालुक्यातील सर्व निवडणूका आम्ही आमच्या ताकतीवर लढणार आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेंनी कितीही लक्ष घातले किंवा ते कितीही गरम झाले, तरी त्यांना थंड करुन घरी बसविण्याची ताकत आमच्यात आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार शिंदेंना लगावला आहे. जावळीतील पराभव गटबाजीतून झाला असून त्याचे खापर माझ्यावर फोडण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावे. तसेच बँकेचे अध्यक्षपद मिळणे किंवा न मिळण्याशी त्यांच्या शिफारशीचा काहीही संबंध नाही, केवळ सहानभूती मिळवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

माझी शिफारस कमी पडल्याने शिवेंद्रसिंहराजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. मागील वेळी मी शिफारस केल्यानेच त्यांना बँकेचे अध्यक्षपद मिळाले होते, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले होते. त्याला आज आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रतिउत्तर देत आमदार शिंदेंचा मुद्दा खोडून काढला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मागील वेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राष्ट्रवादी भवनात प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती.

Shivendraraje Bhosale, Shashikant shinde
शशीकांत शिंदे म्हणतात की, माझी शिफारस कमी पडल्यानेच शिवेंद्रसिंहराजेंचे अध्यक्षपद हुकले...

त्यावेळी मी सर्वांना पाच वर्षे अध्यक्षपद देणार असाल तरच मी बँकेचा अध्यक्ष होण्यास तयार आहे, अशी मी भूमिका मांडली होती. त्यावेळी पाच वर्षे अध्यक्षपद देण्यास आमदार शशिकांत शिंदे यांनी हरकत घेतली होती. पण, मला सहा वर्षे अध्यक्ष पद मिळाले. यावेळेस जिल्ह्यातील नेत्यांसह बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुन्हा तुम्ही अध्यक्ष व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या मागणीनुसार मी श्री. पवार साहेब यांना भेटून दुसऱ्यांदा संधी देण्याची मागणी केली होती. पण, त्यांनी नितीन पाटील यांच्या नावाला मान्यता दिली.

Shivendraraje Bhosale, Shashikant shinde
या कारणांसाठी सभापती रामराजेंनी मानले शिवेंद्रसिंहराजेंचे आभार...

माझा नितीन पाटील यांना कोणताही विरोध नव्हता. उलट मी त्यांच्या नावाला एका मिनिटात सूचक होण्यास तयार झालो. आम्ही खूप चांगले मित्र असून त्यांना माझे कायम सहकार्य राहणार आहे. त्यामुळे आमदार शिंदेंच्या शिफारशीमुळे मला मागील वेळी अध्यक्षपद मिळालेले नव्हते आणि यावेळेसही त्यांच्या शिफारशी अभावी मिळाले नाही. जावळीतील पराभव हा गटबाजीच्या राजकारणातून झाला आहे, त्यांचेच ठराव असूनही लोक त्यांच्यासोबत का राहिले नाहीत याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

Shivendraraje Bhosale, Shashikant shinde
जावळीतील दहशत मोडून काढण्यासाठीच रांजणे यांचा विजय आहे; शिवेंद्रसिंहराजे भोसले;पाहा व्हिडिओ

शिंदेंनी त्यांच्या आमदारकीत भाऊसाहेब महाराजांचे मोठे योगदान असल्याचे सांगत आहेत. पण त्यांनी भाऊसाहेब महाराजांच्या पडत्या काळात किती मदत केली, त्यांना मंत्रीपदासाठी डावलले होते त्यावेळी तुम्ही किती शिफारशी केल्या होत्या, याचे उत्तर द्या. केवळ सातारा तालुक्यात सहानुभूती मिळविण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न आहे. बँकेत काही फॉर्म्युला ठरला आहे का, यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे यांनी नावे जाहीर करताना अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे एक वर्षासाठी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी एकाला संचालकाला संधी मिळणार आहे.

Shivendraraje Bhosale, Shashikant shinde
शशीकांत शिंदेंची जावळीत दादागिरी; अरेरावीला जशास तसे उत्तर देणार....

जावळीत पक्ष वाढीची जबाबदारी पार पाडत होतो, असे आमदार शिंदेंनी सांगितले आहे, याविषयी विचारले असता, शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, तुम्ही जावळीत पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत होता. तर सौरभ शिंदेंचा पराभव का झाला, प्रवीण देशमाने यांचा पराभव का झाला, याचे उत्तर द्यावे. सभापती अरूणा शिर्के यांच्या विरोधात तक्रारी करण्या मागे कोण होते याचे उत्तर शिंदेंनी द्यावे. पक्ष वाढवण्यासाठी जावलीच का, असा प्रश्न करून माण, खटाव किंवा पाटणमध्ये पक्ष वाढविण्यास जावे, त्यांचे जावलीत का लक्ष आहे हे आमच्या लक्षात आले असून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात... हे न समजण्याइतका मी नाही.

Shivendraraje Bhosale, Shashikant shinde
जावळीतील दहशत मोडून काढण्यासाठीच रांजणे यांचा विजय आहे; शिवेंद्रसिंहराजे भोसले;पाहा व्हिडिओ

आगामी निवडणूकांत तुम्ही भूमिका काय असेल, यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, भविष्यातील सर्व निवडणूका या आमच्या ताकतीवर लढणार आहे. त्यामुळे त्यांनी किती लक्ष घातले किंवा ते कितीही गरम झाले तरी त्यांना थंड करुन घरी बसविण्याची ताकत आमच्यात आहे, असेही त्यांनी सांगितले. जावळीतील ऊस नेण्यातही राजकारण केले जात असल्याचा आरोप शशीकांत शिंदे यांनी केला होता. त्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आम्ही ऊस नेणार नाही असे म्हटलेले नव्हते. उलट शशिकांत शिंदे यांना जरंडेश्वरच्या टोळ्या मिळाल्या नाहीत, यात माझा काय दोष, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com